जेव्हा विन्स्टन चर्चिलला अमेरिकेकडून दारू प्यायची परवानगी घ्यावी लागली.

विन्स्टन चर्चिल.

अनेकांना तो त्याच्या देशप्रेमासाठी आवडत असेल मात्र दर्दी लोकांना तो त्याच्या दारूप्रेमासाठी आवडतो !!!

वेळापत्रकानुसार दारू पिणारा तो एकमेव नेता असेल. पण एक वेळ अशी आली होती कि जगातल्या या सर्वात शक्तिशाली नेत्यावर देखील दारू प्यायला परवाना मिळवावा लागला होता आणि तोही अमेरिकेकडून. 

सन १९३१ साली चर्चिल विविध विषयांवर लेक्चर देण्यासाठी अमेरिकेला गेला होता. याच काळात अमेरिकेत दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली होती. शिफारशी शिवाय दारू मिळवणे शक्य नव्हतं आणि चर्चिलला अमेरिकेत कोणी शिफारस देईल अशी परस्थिती नव्हती.

twitter

 

अगोदरच दारू नसल्याने वैतागलेला चर्चिल आपल्या मित्राला भेटण्यासाठी वांशिग्टनला पोहचला. चर्चिल टॅक्सीतून उतरला. ब्रिटन आणि अमेरिकेमधील वाहतुकीचे नियम बरोबर उलटे असल्यामुळे रस्ता ओलांडताना त्याचा गोंधळ उडाला आणि एका गाडीने त्याला उडवले. जवळपास दोन आठवडे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चर्चिल आपला पुढील दौरा करायला तयार झाला होता.

अजूनही त्याचा निम्मा दौरा राहिला होता आणि चर्चिलला भीती होती कि हा प्रवास दारू न पिता जमणार नाही. ज्या रुग्णालयात तो उपचार घेत होता बहुतेक तेथील डॉक्टरांना त्याची अवस्था समजली, तेथील डॉक्टरांनी त्याला बंदी असून देखील दारू पिण्यासाठीचा परवाना लिहून दिला.

आत्ता चर्चिलचा अपघात झाला होता की चर्चिल दारूसाठी स्वत जावून धडकले हे चर्चिलच जाणे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here