मुस्लीम समाजात दाढी का वाढवतात ? 

मुस्लीम समाजातील माणसं त्यांच्या दाढीमुळे चटकन लक्षात येतात. पुढचा मुस्लीम आहे हे समजल्यानंतर त्याला आडवं तिरकं प्रश्न विचारून तुम्ही कुणाच्यातले या प्रश्नाच्या मुळात जायचं काम अनेकांच वाचतं. आडनावावरुन जात शोधण्याचं कौशल्य बऱ्याच जणांना आत्मसात असतं. ते लोकं समोरचा व्यक्ती मुस्लीम आहे हे समजल्यानंतर नाराज होतात. एका अज्ञान कौशल्याचं प्रात्यक्षिक करता आलं नाही त्यामुळे ते लोक नाराज होतात. पण या सगळ्यात समान धागा असतो तो दाढीचा.

मुस्लीम समाजात दाढी मोठ्ठी ठेवून मिश्या कमी ठेवण्याची प्रथा आहे. प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा या ज्याच्या त्याच्या मानण्याच्या गोष्टी. दूसऱ्या धर्माला त्रास न होता आपल्या धर्माचं पालन करणं हा घटनेनं दिलेला अधिकार आहे त्यामुळ हि प्रथा चुकच आहे की बरोबर आहे असल्या नादात कोणीच पडता काम नये पण प्रथा समजून घ्यायलाच हव्यात.

मुस्लीम समाजातील युवकांच काय मत आहे ?

हल्लीची पोरं प्रथा पाळत नाहीत हि आई वडिलांकडून सर्वसामान्य ठोकली जाणारी आरोळी इथेही लागू आहेच. बरीचशी तरूण मुलं दाढी ठेवत नसल्यानं नेमकं कारण देखील तरुणांकडून समजत नाही. मात्र मोठ्ठे लोक अल्लाह चा दाखला देतात. त्यांच्या मते अल्लाहनं सांगितलेला आदेश आम्ही मानतो. कुराणमध्ये दाढी ठेवण्याबाबत सांगितल असल्यानं आम्ही दाढी ठेवतो.  तर भारतातले बुद्धीवादी सांगतात की, महमंद पैंगबरांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये दाढी वाढवणं हे महत्वाचं कारण आहे. पैंगबर हे स्वत: मोठ्ठी दाढी ठेवत आणि मिश्या बारक्या ठेवत म्हणूनच अनेकजण दाढी मोठ्ठी ठेवून मिश्या बारीक ठेवतात.

इतिहास काय सांगतो ?

इतिहासाची फाईली गुगलवर चाळताना असा संदर्भ मिळतो की,  अरब देशांमध्ये असणाऱ्या एका जमातीस मजूसी म्हणत असत. हि जमात मुस्लीमांचे पहिल्या काळातले मुख्य शत्रू होते. या समाजातील लोकं मोठ्या मिश्या ठेवत तर दाढी ठेवत नसत. यातूनचं मुस्लीम समाजाला त्यांच्याहून वेगळं दाखवण्याची गरज निर्माण झाली. त्याच्याहून उलट ठेवायचं म्हणून मिश्या कमी ठेवून दाढी वाढवण्यास मुस्लीम समजाने सुरवात केली.

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here