स्वत:ला ब्राह्मण समजणारा इंग्रज.

लाल मातीचा, नारळाच्या, सुपारीच्या झाडांचा आणि समुद्राच्या तटावर अथांग पसरलेला कोकण. एखाद्या सौंदर्याची खाणच जणू अवतरली असावी असा हा निसर्गाने नटलेला प्रदेश. इथली माणस देखील फणसासारखीच आहेत, वरून टणक पण अंतकर्णातून प्रचंड गोडवा असणारी ही माणस, त्यांच्या सहवासाचा मोह कुणालाच आवरणार नाही तसेच या माणसांनी आणि कोकणातल्या या निसर्गाने एका इंग्रज अधिकाऱ्यास देखील भुरळ घातली होती.

तो अधिकारी म्हणजे आरथर जॅक्सन. 

इतिहास हा जितका रोमांचक आणि शहरणारा असतो, तसाच तो अनेकदा नाण्याची एकच बाजू दाखवणारा देखील असतो. इंग्रजांच्या १५० वर्षाच्या सत्तेच्या इतिहासाचे देखील असेच आहे. इंग्रजांनी केलेले जुलूम, त्यांनी लादलेल कर स्वातंत्र्यासाठी आपल्या देशातील लोकांचे गेलेले असंख्य बळी याच बाजूचा इतिहास आपल्यला माहिती आहे. तसा तो खरा ही  आहेच पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे काय ?

ही दुसरी बाजू दर्शवण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे मराठी जाणणारा आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारा इंग्रज अधिकारी जॅक्सन.

याच त्याच्या अभ्यासाचा भाग म्हणजे अथांग आणि विखुरलेल्या कोकणातली संस्कृती, इतिहास यांचा अभ्यास आणि संकलन करून त्याने १९१४ साली लिहलेले “Folklore Notes: Konkan” हे पुस्तक. या पुस्तकात त्याने कोकणातील चालीरीती, समजुती, जाती जमाती, आणि धार्मिक संस्कृती यांच्या बाबत लिखाण केले आहे. त्याचमुळे त्याकाळात लोक त्याला पंडीत जॅक्सन असे म्हणत,खर तर भारतीयांनी नेहमीच विद्या आणि ज्ञानी माणसांचा आदर केला आहे हा त्याच आदराचा भाग होता.

सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृतीवर अभ्यास करणाऱ्या जॅक्सनवर भारतीय लोक तितकेच प्रेम करत होते. याच प्रेमभावनेतून तो स्वतःला गमतीने पूर्वजन्मीचा वेदविद्याविभूषित ब्राह्मण असल्याचे सांगायचा.

आपल्यापैकी अनेकजण कोकणात गेले असालच. जॅक्सनने १०० वर्षापूर्वी लिहलेल्या या पुस्तकात आजचा कोकण तंतोंत समोर उभा राहतो. कोकणातील परंपरा. समजुती, चालीरीती, धर्म, लोककला, व्यवसाय असे अनेक पैलू या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाला कोकणाचे encylocopedia म्हणले तरी ती अतिशोक्ती ठरणार नाही. दापोली, विजयदुर्ग, दाभोळ, मालवण, देवरुख, चिपळूण, साखरपे, कणकवली अशा असंख्य गावांचा उल्लेख या पुस्तकात आहे. या पुस्तकात कोकणी माणसाचा लाघवी स्वभाव आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या चालीरीती आणि अंधश्रधा याबाबत देखील जॅक्सन तळमळीने या पुस्तकात लिहते झाले आहेत.

१९०९ च्या दरम्यान अंधेरी, मलाड, हे कोकणातील ठाणे जिल्ह्याचे बाह्य भाग होते. हा सगळा परिसर जॅक्सनने पिंजून काढल्याचे त्या पुस्तकाच्या लिखाणातून दिसून येते. ब्रिटीश इंडिया प्रेसने हे पुस्तक प्रकाशित देखील केले आहे. जॅक्सनने जसे कोकण मांडले आहे त्याच धर्तीवर अजून एका राज्याबाबत त्याने लिखाण केले आहे. ते राज्य म्हणजे आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात राज्य. गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्याबाबत सविस्तर माहिती असणारे आणि तेथील संस्कृती दर्शवणारे हे पुस्तक एकमेव असेच आहे.

इतके विपुल आणि समृद्ध लिखाण करणारा जॅक्सन, हा शेवटी होता इंग्रज अधिकारी अर्थात आपल्यावर राज्यकरणाऱ्या इंग्रज शासनाचा प्रतिनिधी. 

विद्रोह हा कधीच माणूस बघून जन्माला येत नाही, तो एक विचार आहे आणि तो सर्वसमावेशक जसा असतो तसाच तो सगळ्यांना एकाच तराजूत तोलणारा देखील असतो. १९०० चा काळ म्हणजे राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना प्रत्येक भारतीय मनात होती. स्वातंत्र्यसाठीचा उद्रेक सगळ्या देशात पसरला होता. हा विद्रोह माणूस कोण आहे हे अजिबात पाहत नव्हता? तेव्हा दिसत होते ते एकच स्वातंत्र्य आणि त्यासाठी प्रत्येक ब्रिटीश अधिकारी हा चुकीचाच ठरवला जाणे.

याच काळात जॅक्सन नाशिकचा कलेक्टर होता आणि त्याची बदली मुंबईला झाली होती. इंग्रज अधिकारी असून देखील त्याचे भारतीय संस्कृतीवर असणारे प्रेम हे नक्कीच भारतीयांना त्याच्या प्रेमात पडणारे होते. तेव्हाच्या लोकांमध्ये जॅक्सन बद्दल प्रचंड आदर आणि प्रेम होते. म्हणूनच त्याने नाशिक सोडण्याआधी त्याला निरोप देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

दिनांक २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात जॅक्सनला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी संगीत शारदा नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता.

जॅक्सनच्या हत्येमुळे प्रचंड खळबळ माजली. इंग्रजांच्या कटातून कान्हेरे आणि साथीदारांना पकडण्याची तयारी सुरु होती तर दुसरीकडे मात्र अनेक भारतीय जॅक्सनच्या मृत्यामुळे व्यथित होते. नाशिक मधील अनेक लोकांना हे कृत्य अजिबात आवडले नव्हते. त्या लोकांनी शोकसभा घेतल्या आणि जॅक्सनला श्रद्धांजली देखील वाहिली.

कान्हेरे यांनी केलेले ते कृत्य स्वतंत्र्य लढ्यात अनेकांना प्रेरणा देणारे होते हे मान्य करायलाच हवे आणि भारतीय म्हणून त्याचा आपणास अभिमान ही असलाच पाहिजे. पण जॅक्सनचं कार्य विसरता कामा नये.

हे ही वाचा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here