मेहमूदने राजीव गांधींच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले..

मेहमूद आठवतोय का? कॉमेडीचा पहिला सुपरस्टार. मेहमूद नसेल तर पिक्चर फ्लॉप असं गणित फिल्म डिस्ट्रीब्यूटरच असायचं. त्याकाळात त्याचा शब्द पिक्चरच्या हिरोपेक्षा वजनदार होता असा हा मेहमूद.

आपल्याला मेहमूद आठवतो तो अंदाज अपना अपना मधला कास्टिंग डायरेक्टर जॉनी म्हणून. पहेलेसेही उल्लू असलेल्या सलमान ला पिक्चरचा हिरो बनवायचं स्वप्न विकणारा जॉनी.

मेहमूदने खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांना ब्रेक दिला होता. अनेकांचे बुडते करीयर सावरले होते. त्यातलं महत्वाच नाव म्हणजे अमिताभ बच्चन. बच्चनचे अनेक पिक्चर पडले होते. आहे त्या प्रोजेक्टमधून त्याला बाहेर काढलं जात होत. अशा वेळी त्याला कोणीतरी सांगितलं की मेहमूद को जाके मिल वो तुम्हारा काम कर देगा.

हा किस्सा हनीफ झवेरी नी लिहिलेल्या “मेहमूद: अ मन ऑफ मेनी मूड्स ” या पुस्तकात सांगितला आहे.

मेहमूद त्यावेळी बॉम्बे टू गोवा पिक्चरच्या कास्टिंगच काम करत होता. त्याला कंपोज नावाच्या ड्रगची वाईट खोड होती. या ड्रगची टॅब्लेट तोंडात टाकून तो नशा करत असे. एकदा त्याला भेटायला अमिताभ आपल्या एका मित्रासोबत आला. मेह्मुदच्या भावाने अन्वर अलीने दोघांना ओळखले आणि ऑफिसमध्ये आत घेऊन आला. मेहमूद साहेब तेव्हा ड्रगच्या नशेत होते. अन्वर कडे पर्याय नव्हता. त्याने दोघांची मेह्मुद्शी ओळख करून दिली.

नशेत असलेल्या मेहमूदने दोघांकडे पाहिले. त्याने लगेच टेबलच्या ड्रॉवर मधून ५००० रुपयांचं बंडल काढलं आणि अन्वर कडे दिल आणि अमिताभ च्या दोस्ताला हे पैसे द्यायला सांगितले. अन्वरला काही कळेना. त्यान मेहमूदला कारण विचारलं.

मेहमूद म्हणाला,

” ये लडका अमिताभ से ज्यादा गोरा और स्मार्ट है. ये आगे चलकर इंटरनेशनल स्टार बनेगा. इसको पैसे दो और साईन करलो. अगली पिक्चर में ये काम करेगा.”

हे ऐकल्यावर अन्वरचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. कारण बच्चन सोबत आलेला त्याचा मित्र म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा जेष्ठ चिरंजीव राजीव गांधी होता. आणि मेहमूद त्याला इंटरनॅशनल स्टार करायला उठला होता. अन्वर भावाला समजावून सांगितलं “तुमने इन्हे पेह्चाना नही . ये इंदिराजीके सुपुत्र राजीव गांधी है” हे ऐकल्यावर मेहमूदचा नशा खाडकन उतरला. काहीतरी वेगळे बोलून त्याने तो विषय मिटवून टाकला. तिथल्या तिथे अमिताभची निवड बॉम्बे टू गोवाचा हिरो म्हणून केली.

पुढे एकदा खाजगीत बोलता बोलता अमिताभ म्हणाला होता की मेहमूदचं एकदम बरोबर होत. राजीव खरोखर इंटरनशनल स्टार होता. पण फरक हा की तो सिल्वरस्क्रिनचा नाही तर राजकीय क्षेत्रातला स्टार होता.

हा किस्सा सोनिया गांधीच्या चरित्रात रशीद किडवाई यांनी लिहिला आहे.

हे ही वाच भिडू

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here