अंडरपँटचा खप कमी झाला की ओळखायचं “मंदी आली आहे.”

तुम्ही रोज कामाला जाताय, घरचे हप्ते भरताय अन आठवड्याच्या शेवटी बाहेर हॉटेलात जेवायला जाताय.  एवढे जरी करत असाल तर तर तुमचे नीट चालले आहे असं  समजायला काहीच हरकत नाही. परंतू तुमचा मालक पगार वाढवत नाही, तो तुम्हाला अनेक कारणे देऊन आहे त्या पगारावर ठेवतो. आहे त्या पगारावर घरखर्च  भागवणे परवडत नाही. मग तुम्ही गरजा कमी करून भागवायला लागता. जेव्हा तुम्ही जुनी झालेली  अंतर्वस्त्रे तशीच वापरता तेव्हा तुमच्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थेत सगळं आलबेल नाही असं  समजायला काही हरकत नाही.

हे निरीक्षण आहे अमेरिकेच्या फेडरल बँकेचे( मध्यवर्ती बँक) माझी अध्यक्ष राहिलेले अॅलन ग्रीनस्पन यांचे.

१९७० च्या कालखंडात अर्थशास्त्रज्ञ अॅलन ग्रीनस्पन यांनी  अर्थव्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी ‘मेन्स अंडरवेअर इंडेक्स अर्थात अंतर्वस्त्र निर्देशांक विकसित केला. अॅलन यांनी ७० च्या दशकात अर्थव्यवस्थेची कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीवरून करण्यास सुरुवात केली. त्यांच्या दाव्यानुसार जेव्हा अंतर्वस्त्रांची विक्री वाढत असते तेव्हा अर्थव्यवस्था वाढत असते अन जेव्हा विक्री थंडावते तेव्हा अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नाही. या थिअरीच्या मागे ग्रीनस्पन यांचा होरा असा होता की पुरुष साधारपणे आपल्या अंतर्वस्त्रांना इतर  गोष्टी म्हणजे उंची कपडे यांपेक्षा अधिक महत्व देतो.

या थिअरिला ( सिद्धांताला) विरोधदेखील झाला आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञानी अॅलन यांना वेड्यात काढले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. भारतीय वाहन उद्योगाला याचा सर्वात जास्त फटका बसला असून महिंद्रा, मारुतीसारखे समूह कामगारकपात करण्याच्या मार्गावर आहेत. 

अशा परिस्थितीत भारतीय अंडरगारमेंट उद्योगाने दिलेली आकडेवारी  अॅलन ग्रीनस्पन यांच्या मंदीच्या सिद्धांताशी मिळतीजुळती आहे.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या १६ ऑगस्टच्या वृत्तानुसार, पेज उद्योग जो जॉकी या नावाने बाजारात विक्री करतो त्यांनी 2008 पासूनची सर्वात कमी (स्थापन झाल्यापासून) विकास दर(२%) या तिमाहीत नोंदवला आहे. तर डॉलर अन व्हीआयपी क्लोदिंग यांनी अनुक्रमे ४% अन २०% विक्रीघट नोंदवली आहे.

मोटार विक्रीनंतर आता अंडरगारमेंटने मंदीसदृश परिस्थितिची जाणीव करून दिली आहे असं म्हणण्यास वाव आहे.

  • शेखर पायगुडे

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here