जगातल्या दहा सुंदर राजकारणी महिला…

 

बोल भिडूच्या वाचकांसाठी खास संध्याकाळचं आकर्षण म्हणून घेवून आलो आहे जगभरातल्या अशा प्रमुख दहा महिला राजकारणी ज्या पाहिल्यानंतर तूमचं एक मत सुद्धा हिकडं तिकडं जाणार नाही यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. 

 

आपला पक्ष पोरींवर लक्ष्य…..

 

 

1. श्रीमती ईव्हा केयली. (ग्रीस)

 • सध्या युरोपियन पार्लमेंटच्या सदस्य.
 • राजकारणात येण्याआधी न्युज अँकर म्हणून काम करायच्या.
 • आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतली आहे. आर्ट्समध्ये मास्टर डिग्री आणि सध्या अर्थशास्त्रात PhDच काम सुरू असल्याचं कळतय.

 

 

2. श्रीमती ऑर्ली लेव्ही. (इस्राईल) 

 • वडील देशाचे परराष्ट्रमंत्री होते त्यांच्या पायावर पाय ठेवतं राजकारणात आल्या.
 • राजकारणात येण्यापूर्वी मॉडेल तसेच टीव्ही होस्ट म्हणून काम करायच्या.
 • सध्या तीन मुलांची आई आहेत.

 

 

3. श्रीमती निकोल मिनेटी. (इटली)

 • इटली चे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बरलास्कॉनी यांच्या कार्यकाळात इटलीच्या राजकारणात महत्वाचे स्थान.
 • दातांची डॉक्टर म्हणून प्रसिद्ध.
 • राजकीय कारकिर्दीपेक्षा बरलोस्कॉनीवर असलेल्या लैंगिक आरोपात त्यांना मदत केल्याबद्दल जास्त चर्चेत राहिल्या.

 

 

4.श्रीमती हिना रब्बानी खार. (पाकिस्तान) 

 • शेजारच्या काकू म्हणून सुपरिचीत.
 • २०११ ते २०१३ या काळात वयाच्या ३३ व्या वर्षी पाकिस्तानची परराष्ट्र मंत्री झाल्या.
 • पाकिस्तानात या पदावर निवड होणारी सर्वात तरुण तसेच पहिली महिला व्यक्ती.
 • २००९ मध्ये पाकिस्तानचा अर्थसंकल्प मांडणारी पहिली महिला.
 • ती सध्या काय करतेय…

 

 

5. श्रीमती मारा कॅरफॅंगा. (इटली) 

 • कायद्याची पदवीधर, राजकारणात येण्यापूर्वी मॉडेलिंग, इटालियन टिव्ही मध्ये काम.
 • २००७ मध्ये फोरझा इटालिया पक्षातर्फे चेंबर ऑफ डेप्युटी मध्ये निवड.
 • २००८ मध्ये पंतप्रधान सिल्व्हिओ बरलोस्कॉनी यांनी त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले.
 • या काळात त्यांना जगातील सर्वात सुंदर मंत्री म्हणून ओळखल जात.
 • मॅक्सिमच्या जगातील सर्वात हॉट राजकारण्यांच्या यादीत पहिला क्रमांक होता.

 

 

6. श्रीमती जोएना मुचा. (पोलंड) 

 • पोलंड मधील महत्वाची राजकारणी म्हणून सुपरिचीत आहेत.
 • इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टरेट, शिक्षक म्हणून देखील काम केलं आहे.
 • पोलंडची क्रीडा आणि पर्यटन मंत्री म्हणून काम केलं आहे

 

 

7. श्रीमती ल्युसिआना लिऑन (पेरू हे वर्णन नाही तर देशाचं नाव आहे बे )  

 • पेरू मधील एका प्रसिद्ध राजकारण्यांची कन्या.
 • लोकं म्हणतात की आपल्यासारख्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना राजकारणात आणण्यात आलं आहे.
 • पेरूच्या इतिहासात संसदेची सदस्य होणारी सर्वात तरुण उमेदवार.

 

8. श्रीमती युनिस ओल्सन. (सिंगापूर)

 • २००० मध्ये मिस सिंगापूर अवॉर्ड मिळालं आहे.
 • तसेच मॉडेल, अभिनेत्री, टीव्ही होस्ट, संगीतकार म्हणून काम केल आहे.
 • वयाच्या २७ व्य वर्षी सिंगापूरच्या संसदेची नॉमिनेटेड सदस्य.
 • एशियन युथ अवॉर्ड विजेती.

 

9. श्रीमती अलिना कबाईव्हा (रशिया)  

 • रशियाची जिम्नॅस्टिक खेळाडू म्हणून ओळख आहे.
 • २ ऑलंपिक पदके, १४ वर्ल्ड चॅंपियनशिप पदके आणि २५ युरोपिअन पदके देखील मिळवली आहेत.
 • सध्या रशियाच्या राज्य सदनाची सदस्य आहेत.

 

 

10. ज्युलिया बोंक. (जर्मनी)  

 • वयाच्या १४ व्या वर्षी स्थानिक विद्यार्थी कॉउंसिलमध्ये निवड.
 • वयाच्या १८ व्या वर्षी जर्मनीच्या संसदेत निवड (जर्मनीच्या इतिहासातील सर्वात तरुण )

 

आम्हाला माहित आहे आम्ही किती जरी सुंदर वर्णन केलं असतं तरी तुम्ही फक्त फोटोचं पाहीले असते. म्हणून सुंदरतेच वर्ण करणं आम्ही टाळलं. सदरच्या महिला या WTsapp वर असतील अस राहून राहून आम्हालादेखील वाटतं.

असो तर,
आम्ही अखंड कष्ट करून दहावरतीच पोहचलो असून आम्हाला प्रथम बोलभिडू वाचकांची गरज भासत आहे तुम्हाला परिचित असणारे नाव कमेंटमध्ये लिहा..
आकर्षक नाव पाठवणाऱ्याचा उचित सत्कार केला जाईल…

2 COMMENTS

 1. पेरू हे वर्णन नाही, देशाचं नाव आहे बे😂😂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here