कोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.

 

भारतात कोणी महत्वाची व्यक्ती जाणार असेल तर अंदाजे आठवडाभर Wtsapp केला जातो. जवळच्या व्यक्तींना फोन करुन “कन्फर्माय” ची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला जातो. फिक्स बातमी आहे म्हणून जवळच्या कार्यकर्त्यानकडून सात्वंनपर मॅसेज तयार केले जातात इतकं सगळ कांड भारतात होत असताना जगात मात्र माणसांच्या मरण्याचा अचूक अंदाज लावला जात आहे.

द डेथलिस्ट नावाची वेबसाईट माणसांच्या मरण्याचा अचूक अंदाज देत आहे. २०१८ साली कोण जाईल ? या त्यांच्या लिस्टमध्ये स्टिफन हॉकिंग याच नाव असल्यानं ते चर्चेत आलेली आहे.

हि वेबसाईट काय करते –

  • दरवर्षी कोण जावू शकतं याचा अंदाज लावते. जागतिक लेव्हलवर निवडक ५० लोकांनी नावं प्रसिद्ध केली जातात.
    नाव सिलेक्ट करताना ज्या व्यक्ती शेवटच्या क्षणात आहे अशी नावं टाळली जातात. अकस्मित कोण जाईल याचा विचार केला जातो.
  • मागच्या वर्षीची नावं पुढच्या वर्षात घेताना साधारण २५ नावचं घेतली जातातं. दरवर्षी अद्यावत लिस्ट देण्याकडं यांचा कल असतो.
  • जागतिक पातळीवर फेमस असणाऱ्या व्यक्तींचाच यात समावेश केला जातो. उगीच कोणा आयऱ्या गयऱ्याला या यादीत घेतलं जात नाही.

 

 

या बेवसाईटचं यश –

२०१७ साली दिलेल्या एकूण ५० जणांच्या यादीतील १७ लोकं देवाघरी गेली आहेत.
या १७ जणांच्या यादीतील प्रमुख नावं. 
1. ह्यूज हाफनर – प्लेबॉय मासिकाचे संपादक.
2. डेव्हिड रॉकफेलर – अमेरिकन बॅंकर.
3. मेरी टेलर मुरे – अमेरिकन अभिनेत्री.

 

 

 

  • २०१८ च्या लिस्टमधील आत्तापर्यन्त ३ लोकं देवाघरी गेली आहेत. या लिस्टमध्ये स्टिफन हॉकिंग यांचा समावेश होता. हे उर्वरीत दोनजण म्हणजे, 
  1. बिली ग्राहम – अमेरिकन धर्मप्रसारक वय वर्ष १००.
  2. मार्क स्मिथ – ब्रिटिश गायक वय ४१.

२०१८ च्या यादीत कुणाची नाव आहेत ( हे असलं वाचायला लय आवडतं आपल्याला )
1. प्रिन्स फिलीप – इंग्लंडचा राजा.
2. हेन्री किसींजर – अमेरिकन राजकारणी व लेखक.
3. जॉर्ज बुश सिनियर – जॉर्ज बुश यांचे वडिल.
4. सिन कॉनरी – जूना जेम्स बॉण्ड.

 

अधिक माहितीसाठी –  
या वेबसाईटचा सर्वांधिक उपयोग गावच्या म्हाताऱ्यांना रडण्याची पुर्वतयारी करण्यासाठी होत असल्याचं आमच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here