वर्ल्ड ट्रेड सेंटरवरुन शेवटच्या सेकंदाला उडी मारणारा, तो कोण होता ? 

११ सप्टेंबर २००१. तारिख लक्षात असेलच. या दिवशी अमेरिकेवर सर्वात मोठ्ठा दहशतवादी हल्ला झाला. आकाशातून विमानं आली आणि एक एक करत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये घुसली. जगाच्या पाठीवर सर्वात उंच गणल्या जाणाऱ्या न्युयार्कमधील बिल्डींग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. 

अमेरिकेनं युद्ध पुकारलं. तालिबान खणून काढलं आणि लादेनला समुद्रात गाडून दाखवलं. इतिहासाच्या पुस्तकात नव्या धड्याची भरती झाली.

या घटनेत एक फोटो असा निघाला, “जो आजपर्यन्त सर्वांना भंडावून सोडतो.” 

तोच हा फोटो. या फोटोत काय दिसतय तर ११० मजल्यांच्या इमारतीवर जेव्हा विमान धडकू लागले तेव्हा एका माणसांन जिवाच्या भितीने १०६ व्या मजल्यावरुन उडी मारली !! आश्चर्य वाटतय न. हेच आश्चर्य त्यावेळी एसोसिएटेड प्रेसच्या फोटोग्राफर रिचर्ड ड्र्यू ने काढलं होतं. दूसऱ्याचं दिवशीच्या न्यूयॉर्क टाईम्स सहित जगभरातील सर्वच पेपरात हा फोटो छापण्यात आला. हा फोटो जेव्हा छापला तेव्हा टिका देखील झाली. लोकं म्हणाले, एखाद्या माणसांचा मरण्याच्या काही सेकदांपुर्वी फोटो काढणं किती योग्य आहे. लोकांना मत असतात त्यामुळे बोलू शकतात. पण पुढं झालं असं की काही दिवसात पुन्हा हा फोटो फिरू लागला लोकांनी वेगवेगळे अर्थ लावले आणि ९/११ चा एक ऑयकॉनिक फोटो म्हणून तो गणला गेला या फोटोला नाव देण्यात आलं “द फॉलिंग मॅन” !

twitter

त्यानंतर शोध सुरू झाला तो हा माणूस नेमका कोण होता त्याचा. 

हा फोटो काढला होता तो रिचर्ड ड्र्यू यांनी. ते म्हणतात की, “जेव्हा हल्ल्याची कल्पना आली तेव्हा सर्वजण लांब पळत होते पण अशावेळी आम्हाला जीव धोक्यात घालून घटनास्थळाकडं पळावं लागतं. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला वरच्या भागातून अनेकजण उड्या मारताना दिसले. मी पटकन त्यांचे फोटो काढू लागलो. अनेकजण भितीपोटी ११० मजल्यांच्या इमारतीवरुन खाली उडी मारत होते. त्याचवेळी १०६ व्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या व्यक्तीचा फोटो मला मिळाला.” 

हा माणूस नेमका कोण याबद्दल खूप चर्चा झाल्या. सरकारने देखील त्या माणसाची माहिती गुप्तच ठेवली होती. सरकारचं म्हणणं होतं अशा प्रकारे शेवटच्या सेकंदाला उडी मारणाऱ्यांची संख्या तब्बल २०० च्या दरम्यान होती. 

हे ही वाचा –

त्याच्या कपड्यांवरुन पहिला नाव समोर आलं ते १०६ व्या मजल्यावर असणाऱ्या विडोंज ऑन द वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या नॉब्रेतो हेनॉर्डिंस या शेफच. त्याच्या घरातल्यांनी देखील या गोष्टीला दूजोरा दिला मात्र काही दिवसातच त्यांनी तो नॉब्रेतो नसल्याचं सांगितलं. त्यानंतर दूसऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलं. जॉनॉथन बिली अस नाव असणारी हि व्यक्ती ऑडिओ टेक्निशयन होती. घरातल्यांनी देखील तोच असल्याची खात्री केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी देखील तोच असल्याची शक्यता वर्तवली पण त्याबाबत देखील खात्री करण्यात आली नाही. 

पण या सगळ्यात मुद्दा राहिला तो आपण मरणार आहोत हे माहित असताना देखील एवढ्या उंचावरुन लोक उडी का मारत होते. संशोधक म्हणतात शक्यता. पहिली शक्यता मोठ्ठी होती. बिल्डींग कोसळत होती आणि हे डोळ्यांसमोर दिसत होतं अशा वेळी दूसरी शक्यता त्यांच्यासमोर निर्माण झाली आणि त्यांनी मरण्याच्या अगदी काही सेकंद ११० व्या मजल्यावरुन उड्या मारल्या.

यात देखील ते मेलेच फरक फक्त इतकाच की काही सेकंद उशीरा !  

हे ही वाचा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here