महात्मा गांधींचा तो डाएट प्लॅन ज्याचे फॅन सुभाषचंद्र बोस देखील होते. 

अस सांगितलं जात की, “तुम्ही जे खात तेच तुम्ही बनता.”

महात्मा गांधींचा आहार पाहिला तर हे वाक्य तंतोतंत लागू होतं. म. गांधीचा आहार नेमका काय होता. त्यांचा डाएट प्लॅन कसा असायचा याची उत्सुकता त्या काळात देखील होती आणि आजच्या काळात देखील आहे. त्याच कारण म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत म. गांधींनी एकूण १७ वेळा उपोषण केलं होतं. त्यापैकी एक उपोषण सलग २१ दिवस चालू होते. इतकी उपोषण करून देखील म.गांधींची तब्येत ठणठणीत होती. वृद्धापकाळाच्या वयात देखील म. गांधींना कोणतेही आजार नसल्याचे दाखले दिले जातात.

या सर्व गोष्टींच कारण त्यांचा डाएट प्लॅन असल्याच सांगण्यात येत. 

खुद्द महात्मा गांधी आपल्या खाण्यापिण्यासंबधीत सांगतात की, 

यह मेरे जीवन का शौक रहा हैं. यह मेरे लिए उतना ही जरूरी रहा हैं जितना समय समय पर मुझे व्यस्त रखने वाले अन्य काम. 

वैष्णव पंथात जन्मलेल्या महात्मा गांधींच्या घरात मांसाहारास बंदी होती. पण लहानपणापासून बंडखोर असणारे महात्मा गांधी तारुण्यात मांसाहारी झाले होते. मात्र काही काळानंतर पश्चाताप होवून ते पुर्णपणे शाकाहारी झाले. 

गांधी बिफोर इंडिया या रामचंद्र गुहा यांनी लिहलेल्या पुस्तकात असा उल्लेख आहे की लंडनच्या आपल्या शैक्षणिक वयात गांधींना प्ली फॉर वेजिटेरियनिझम या पुस्तकाने शाकाहारी बनण्यास मदत केली. 

इतकच नाही तर लंडनमध्ये रहात असताना म. गांधी शाकाहाराचा प्रचार देखील करू लागले. लंडनच्या वास्तव्यात त्यांच्या रुमपार्टनरचे नाव जोसीया ओल्डफिल्ड होते. त्याच्या मदतीने त्यांनी वेजिटेरियन सोसायटीचा पत्ता शोधला होता. तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की, ही सोसायटी माणसांनी शाकाहारी व्हावं म्हणून प्रचार करते. ब्रिटीश सैनिक एका बाजूला बियर आणि बीफ खातात तर दूसरीकडे भारतीय सैनिक फक्त डाळ आणि भात खातात. मात्र डाळ भात खाणारे भारतीय सैनिक तुलनेत ब्रिटीश सैनिकांपेक्षा शुरवीर तर आहेत. ते त्यांच्याहून अधिक मोठ्या लढाया करू शकतात. 

त्यानंतर जोसिया आणि म. गांधी यांनी लंडनमध्ये डाळ भाताची पार्टी करण्याचे नियोजन केले. आपल्या कॉलेजमधील सहकाऱ्यांसाठी त्यांनी मिळून डाळभाताची पार्टी दिल्याची नोंद आहे. 

 डाइट अॅण्ड हाइट रिफॉर्म्स, द मॉरल बेसिस ऑफ वेजिरेटियनिझम, की टू हेल्थ अशी  पुस्तके गांधींनी लिहली.  

भारतातील वास्तव्यात म.गांधींनी मसाल्याचा वापर करणं सोडून दिलं होतं. उकलेल्या भाज्या हा त्यांच्या जेवणातला प्रमुख घटक असे. 

अस सांगण्यात येत की,

साबरमतीच्या आश्रमात गांधीसोबत राहणाऱ्या गांधींच्या कुटूंबासाठी म. गांधीचा डाइट प्लॅन फॉलो करणं सर्वात अशक्य गोष्ट ठरत होती. म. गांधीचा दूसरा मुलगा मणिलाल यांच्या पत्नी सुशिला यांनी मणीलाल यांच्या आयुष्यावर असणाऱ्या GANDHI’S PRISONER या पुस्तकात सांगितलं आहे की, 

मला आजही ते जेवण आठवतं. उकडलेली वांगी, उकडलेल्या भाज्या, दही, तुप नसणारे ब्रेड. 

महात्मा गांधी यांनी १९४२ साली आश्रम प्रबंधकांना लिहलेलं एक पत्र आहे त्यामध्ये ते आश्रमामध्ये साखरेची गरज नसल्याचं प्रबंधकांना लिहतात. 

प्रमोद कुमार यांनी GANDHI AN ILLUSTRATED BIOGRAPHY या पुस्तकात फोटोंमार्फत गांधींचे विविध पैलु उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी डाइट प्लॅन करत असल्याचं दिसून येत. अस सांगितलं जातं की म. गांधीच्या डाएट प्लॅनचे सुभाषबाबू फॅन होते. 

सुभाषबाबूंना दिलेल्या डाएट प्लॅनमध्ये म. गांधी लिहतात, 

पाश्चिमात्य देशात कच्चे कांदे आणि लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मी ब्लड प्रेशर साठी नियमित लसूण खातो. लसूण हा सर्वात चांगले एंटिटोक्सिन आहे. 

भारतात या दोन्हीबद्दल विनाकारण गैरसमज आहेत. मला वाटत कांदा आणि लसणांचा उग्र वास हेच त्याचे कारण असावे. वास्तविक कांदा आणि लसणाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. लसणाला तर गरिबांची कस्तुरी समजलं जातं. 

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here