शेतीचं शिवार ते IPS व्हाया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी आकाशाला गवसणी घातल्याची कितीतरी उदाहरणं आपल्या पुढे आहेत. शेतकऱ्यांच्या पोरी देखील या गोष्टीत मागे नाहीत. शहरी समाजमनाला शेतकऱ्यांच्या मुली म्हणजे चुल आणि मुल यात आयुष्य काढत असतील अस वाटत असताना याच मुली डॉक्टर, इंजिनियर, पोलीस अधिकारी, शास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. 

हि गोष्ट अशाच एका शेतकऱ्याच्या मुलीची.

आज ती नागरी सेवा परिक्षा अर्थात UPSC पास होवून IPS झाली. तिची ऑल इंडिया रॅंक २१७ होती. पण त्याहून अधिक महत्वाच आहे तिच्या आयुष्यात आलेला संघर्ष. 

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद इथे राहणारे एक शेतकरी कुटूंब. इल्मा इमरोज अस या मुलीचं नाव. इल्मा लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झालं. वडिल शेतकरी होते. लहानपणापासून इल्मा आपल्या आईसोबत शेतावर जावू लागली. शेतातली सगळी काम करणं हे आईबरोबर तिच्याहि नशीबात होतं. पण इल्माला माहित होतं की यातून आपला अभ्यासच आपणाला बाहेर काढू शकतो. 

इल्माने दहावी, बारावीत चांगले मार्के मिळवले. इतके चांगले की तिच्या हुशारीमुळे तिला दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजला स्कॉलरशीपवर अॅडमीशन मिळाले. तिथच तिला कळाले आपल्या हुशारीमुळे आपणाला स्कॉलरशीप मिळू शकते आणि त्यातूनच आपलं शिक्षण होवू शकतो.

पुढे तिला ऑक्सफर्डमध्ये शिकण्यास गेली.

ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठात स्कॉलरशीपच्या जीवावर हि मुलगी शिकू लागली. मुरादाबादच्या एका खेड्यापासून सुरू झालेला हा प्रवास खूप काही सांगणारा होता. पुढे ती शिक्षणासाठी इंडोनेशिया आणि पॅरिसमध्ये देखील संधी मिळाली. 

पण तिचं मन मात्र भारतात होतं. तिने बाहेरच थांबून UPSC ची तयारी करण्यास सुरवात केली. खाजगी क्लासेसच्या शिवाय UPSC पास होणं तिच्यासाठी महत्वाचं होतं आणि ती झाली देखील ती भारतात 217 व्या रॅंकने उतीर्ण झाली. आज ती हैद्राबाद येथील ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेवून बाहेर पडली आहे. IPS अधिकारी म्हणून देशसेवा बजावत आहे. शेतीच्या शिवारापासून सुरू झालेला हा प्रवास व्हाया ऑक्सफर्ड तीला IPS होवून थांबला. तिचे कष्ट पाहता तसा हा प्रवास इथे थांबण्याची देखील शक्यता कमी वाटते. 

हे ही वाचा.