गांगुलीने मारलेल्या सिक्सरने प्रेक्षकाचं कपाळ फुटलं होतं, त्यानंतर काय झालेलं ते सांगतो.

सौरव गांगुली म्हणजे भारतीय क्रिकेटमधला दादा माणूस. गांगुली जसा भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो, तसाच तो त्याच्या उंचच उंच सिक्सर्ससाठी पण ओळखला जायचा. 

स्पिनर बॉलर जर समोर असेल तर गांगुलीने क्रिझमधून २ पाय पुढे येऊन मारलेले सिक्सर्स बघणं हे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी स्वर्गसुखापेक्षा कमी नव्हतं. जगभरातील एक देखील स्पिनर बॉलर नसेल ज्याला गांगुलीने आपल्या बॅटने फोडून काढलं नसेल.   

तर आजचा किस्सा आहे असाच गांगुलीने मारलेल्या एका सिक्सरचा. ज्यामुळे ग्राउंडमध्ये मॅच बघायला आलेल्या एक प्रेक्षकाचं कपाळ फुटलं होतं. 

तर साल होतं २००२.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. ४ सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानात खेळवली जात होती. 

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ३ विकेट्स गमावून ३३५ रन्स काढले होते. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली मैदानात होते. तेव्हाच स्ट्राईकवर असलेल्या सौरव गांगुलीने एक सिक्सर खेचला. 

प्रेक्षक स्टॅडमध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाने आपल्याकडे येणारा बॉल कॅच करायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याच्याकडून कॅच सुटला आणि बॉल त्याच्या कपाळावर जाऊन आदळला. 

बॉल जोरात येऊन डोक्यावर आदळल्याने त्या प्रेक्षकाचं कपाळ फुटलं आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व्हायला लागला. त्यावेळी पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. बॉल जरी दुर्दैवाने लागला असला तरी यावेळी त्याचा जीव वाचला हे सुदैवच म्हणायला हवं. कारण क्रिकेटचा बॉल डोक्यात पडून मैदानावरच काही क्रिकेटर्सना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे.

नंतर दिवसभराचा खेळ संपल्यानंतर,

गांगुलीने त्या प्रेक्षकाची हॉस्पीटलमध्ये जावून माफी देखील मागितली होती. 

हे ही वाचा –