दारू सोडून लोक आत्ता विंचवाच व्यसन करू लागली आहेत.

१२०-३०० त्यानंतर रिमझीम, त्यानंतर मावा, तंबाखू, सिगरेट, दारू, त्यानंतर गांजा, चरस, अफू… व्यसनांचा हा प्रोटोकॉल. कुणाचं नाव अगोदर घ्यायचं आणि कुणाचं नंतर हा वेगळा विषय. प्रत्येकाचे भक्त आपआपल्या व्यसनाला सन्मान मिळावा म्हणून नक्कीच राडा करण्याची भाषा करतील. व्यसनांच्या याच मांदियाळीत एका नवीन व्यसनाचा समावेश झाला आहे तो म्हणजे विंचू पिण्याचा ?

विंचू आणि तो पण पिण्याचा ? खात असते तर ठिक होतं विंचू पिणार कसं ? तर सांगतो नेमकं व्यसन काय आहे ते ?

काय केल जातं पहिला विंचू शोधला जातो. विंचू सापडला की त्याची बॉडी तुटणार नाही अशा पद्धतीनं त्याला मारलं जातं. विंचूवाचा खून करण्यात आल्यानंतर त्याची बॉडी दोन तीन दिवस उन्हामध्ये सुकवली जाते. ही बॉडी सुकवताना विंचवाच्या बॉडीला मुंग्या लागणार नाहीत यासाठी विशेष काळजी द्यावी लागते. उन्हामध्ये विंचू सुकला की त्याची पावडर तयार केली जाते. ही पावडर सिगरेटमधील तंबाखू मध्ये मिक्स करुन पिली जाते. जर दोन दिवस कढ काढता येत नसेल तर विंचू हलकाच चुलीवर भाजला जातो. तो अलगत फ्राय झाला की बाजूला घेवून कापडात टाकलां जातो. त्यानंतर हळुवार भुकटी करण्याचा कार्यक्रम केला जातो. यापुढील कृती वर उल्लेख केल्याप्रमाणेच.

हे व्यसन नक्की कोण करतं ?

उत्तर भारतात या व्यसनाचा प्रभाव वाढत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या व्यसनाच्या बाबतीत अजूनही पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. पाकिस्तान मधील एकट्या पेशावर ग्रामस्थानी विंचू पिण्यात नाद बंड्या काम केलं असून त्यांना ओव्हरटेक करण्याची क्षमता सध्या तरी आपल्यात नाही. चिनी लोकं सुद्धा पेशावरवासीयांच्या या व्यसनाकडे डोळे विस्फारुन पाहत असल्याचं बोललं जातयं.

हे व्यसन केल्यावर काय होतं ?

व्यसन केल्यावर काय होणार ? जे होतं ते करणाऱ्यालाच माहिती. लोक सांगतात विंचू पिला की माणूस पुर्णपणे वेगळ्याच जगात जातो. त्याला पाच ते दहा तासांमधल काहीच आठवत नाही. मेंदू आणि शरीर यांचा काही केल्या संबध राहत नाही. माणूस कोम्यामध्ये जायची देखील शक्यता असते. इतकं भयानक व्यसन विंचू पिल्यानंतर होतं.

तज्ञांची मते –

(अनेक तज्ञ असल्या गोष्टींवर देखील अभ्यासू मत मांडत असतात याचा विशेष आनंद होतो) तर तज्ञांच्या मते, “विंचवाचं विष हे एकप्रकारचं एसिड असल्यानं त्यापासून व्यसन होणं आम्हाला अशक्य वाटत आहे. कदाचित विंचवाच्या पायांमध्ये किंवा शरिरात असा कोणतारी घटक असावा जो तरुणांच्या बत्यागुल करण्यास कारणीभूत ठरत आहे. आम्ही त्यावर संशोधन करत असून लवकरच विचंवाचा काय मॅटर आहे ते आम्ही स्पष्ट करु.”

थोडक्यात विंचू पिणे हे व्यसन आत्ता नव्यानं आलं असून तरुणांनी यापासून लवकरच दूर राहण्याची गरज आहे अस आम्हाला पर्सनल वाटतं बाकी तुमचं तुम्ही बघा !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here