अझरने कुंबळेला सांगितलेलं, तेंडल्याचं शतक होईपर्यंत खाली बसायचं नाही.

१९८९साली पाकिस्तान दौऱ्यावर भारतीय टीमने एका सोळा वर्षाच्या छोट्या मुलाला नेले होते. सगळ्या जगाला कुणकुण लागली होती की भारताला कोणी तरी वंडर बॉय सापडलाय. काही तरी स्पेशल असणार आहे म्हणूनच त्याला एवढ्या लवकर चान्स मिळालाय. त्याच नाव सचिन रमेश तेंडूलकर. लोकं म्हणत होती की तो पुढचा सुनील गावसकर असणार आहे.

आधीच हायप्रोफाईल सिरीज होती. त्यात प्रचंड मिडिया अटेन्शन सचिन वर होत. पहिल्याच मॅचमध्ये तो १५रन काढून आउट झाला. वसीम, वकार, इम्रान खान यासारख्या धडकी भरवणाऱ्या फास्टर बॉलरसमोर तो उभा राहीला हेच खूप कौतुकाची गोष्ट होती. पुढच्या मॅच मध्ये हाफ सेंच्युरी मारली.

आपल्या लोकांना प्रत्येक गोष्टीची खूप गडबड असते सचिन तर सुरवातीपासून हाय एक्स्पेक्टेशनचा तो शिकार झालेला. काहीही करून. सचिनचा पाकिस्तान दौरा चांगला गेला, पण त्यात त्याने दोन हाफ सेंच्युरी मारली होती. पण तरी लोकांच समाधन व्हायचं नाही. मिडियामधले काही जण म्हणायचे,

“पुढचा गावस्कर म्हणताय पण तो शतक कधी मारणार. “

वनडे मध्ये तर सचिन डकवरच आउट झाला होता. त्यानंतर तर वनडे टीम मधून त्याला डच्चूचं दिला गेला. नाही म्हणायला एका वीस ओव्हरच्या प्रदर्शनीय सामन्यात अब्दुल कादिरची त्याने केलेली धुलाई चर्चेत होती. पाकिस्तान दौऱ्यानंतर न्यूझीलंड दौरा आला. तिथेही सचिन विशेष काही करू शकला नाही. फक्त एकाच टेस्ट मध्ये त्याने जोरदार ८८ धावा केल्या पण शतक राहिलं.

सेंच्युरी पाहिजे ना राव !!

त्याकाळात आजच्या सारखे रोज रोज मॅचेस व्हायचे नाहीत आणि विशेष करून सचिनचा भारतात एकही सामना झाला नव्हता. त्याला बाहेरच्या सुपरफास्ट पिचवरचं खेळवल जात होतं. नवीन असल्यामुळे त्याची पोजिशन सुद्धा ६ नंबर असायची. सचिनला इंडियन टीममध्ये येऊन एक वर्ष व्हायला आल होतं.

आता पुढचा दौरा होता इंग्लंड.

पहिलीच कसोटी लॉर्डसवर झाली. सचिनचा दुष्काळ कायम राहिला. (पुढ १०० शतकं झाली पण लॉर्डसवर शतक झालं नाही.) भारताने ती मॅचसुद्धा गमावली. दुसरी कसोटी मन्चेस्टरच्या ओव्हल मैदानात होणार होती. हे ग्राउंड बॅटिंगला मदत करणारे होते. सचिनने यावेळी ठरवलं इनफ इज इनफ.

भारताचा कॅप्टन होता अझरूद्दीन तर इंग्लंडचा कप्टन ग्रॅहम गूच. या मॅच साठी इंडियन टीममध्ये एका नवीन बॉलरचा समावेश करण्यात आला होता, त्याच नाव अनिल कुंबळे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग निवडली. ग्रहम गूच आणि मिकी आर्थटनच्या ओपिंग जोडीने शतक मारली. भारतापुढे ५१९ धावांचा डोंगर उभा केला.

उत्तर देण्यासाठी भारतीय टीम उतरली. रवी शास्त्री, सिद्धू यांना काय चांगली सुरवात देणे जमले नाही. पण मांजरेकर आणि अझरूद्दीनने इनिंग सांभाळली. माज्रेक्रचं शतक थोडक्यात हुकल. पण अझरूद्दीन खुंटा गाडून बसला होता. त्याच्या जोडीला सहा नंबरवर नेहमी प्रमाणे तेंडूलकर आला.

अझर आणि सचिनने सावध खेळायला सुरवात केली. ही दोघे मोठा स्कोर उभा करणार असं वाटत असताना अझरूद्दीन १७९ रन बनवून आउट झाला. त्याच्या पाठोपाठ परत विकेट्सचं लोंढार लागले. मनोज प्रभाकर ४, कपिल शून्य , मोरे ६, कुंबळे २ धावा बनवून परतले. सचिनची हाफ सेंच्युरी सुद्धा झाली होती. आता शेवटच्या विकेटवर म्हणजेचं नरेंद्र हिरवाणीवर आशा होती. तो टिकला तर भारताचा स्कोर चांगला बनू शकणार होता. हिरवाणीने असला नसला कोन्फीडन्स गोळा करून खेळायला सुरवात देखील केली.

पण दुर्दैवाने सचिनच ६३ रन्सवर असताना हेमिंगजच्या बॉलिंगवर कॅच देऊन आउट झाला. भारताचा डाव ४३२ वर आटोपला. इंग्लंडला जवळपास ८७ धावांची मोठी लीड मिळाली. त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ३२० रन्स बनवल्या आणि आपली इनिंग डिक्लेअर केली.

भारताला जिंकायला ४०८ धावांचे अशक्यप्राय टार्गेट होते. सामना आपल्या हातातून निसटला होता. भारताने ही मॅच कमीतकमी ड्रॉ करायसाठी खेळावे असे मत पडले. दुसऱ्या इनिंगच्या सुरवातीला शास्त्री आणि सिद्धू परत फेल गेले. सिद्धूतर डक वर आउट झाला. मांजरेकरने हाफ सेंच्युरी मारली पण यावेळी अझर सुद्धा लवकर आउट झाला.

तो पर्यंत सचिन आला होता आर या पार असं ठरवूनच. ५ विकेट पडल्या होत्या. शेवटचा दिवस होता. आता मॅच ड्रॉ होणे देखील अशक्य वाटत होतं. सचिन बरोबर खेळणारा अनुभवी कपिल सुद्धा एक रिस्की शॉट मारण्याच्या नादात आउट झाला. पण सचिन निर्विकार होता. काहीही करून मॅच वाचवायची आहे हे त्याच्या मनात होतं.

सचिनची इनिंग चांगली जम बसू लागली होती. त्याच्याबरोबर आलेला प्रभाकर सुद्धा चांगला खेळू लागला. सचिनने आता हात खोलून फटके देखील मारायला सुरवात केली. इकडे पव्हेलीयन मध्ये बसलेल्या प्रत्येकाची धडकी वाढली होती. ही दोघ टिकली तर एखाद्यावेळेस हरण्याची नामुष्की वाचू शकते.

कॅप्टन अझरुद्दीनच सहज लक्ष गेलं की आज पहिली मॅच असेलला बाल्कनीत कुंबळे उभा राहून मॅच बघतोय. अझर थोडा अंधश्रद्धाळू होता. त्याला वाटायचं की जर कोणी चांगलं खेळत असेल तर तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या कोणीही आपली जागा सोडायची नाही. त्यांनी जागा बदलली तर समोरचा प्लेअयर आउट होईल. त्याने फर्मान सोडलं,

“तेंडल्या अच्छा खेल रहा है. अब तू मॅच खडा रेहके ही देखेगा. अगर तू बैठा तो तू घर जायेगा.”

बिचारा कुंबळेला बाथरूमला जाण्यासाठी देखील सोडलं नाही. योगायोग म्हणजे सचिन आणि प्रभाकर आउटचं झाले नाहीत. भारताने मॅच अनिर्णयीत सोडवली. विशेष म्हणजे सचिनची पहिली सेंच्युरी सुद्धा झाली.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here