राजीव गांधीचा तो दुर्मिळ व्हिडीओ, ज्यातून समजत ते राजकारणात कसे आले होते. 

गोष्ट आहे १९८१ सालची. संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. संजय गांधी हे इंदिरा गांधींचे राजकिय वारसदार होते. त्याचबरोबर ते इंदिरा गांधीचे सल्लागार देखील होते. पंतप्रधानपदावर इंदिरा गांधी विराजमान असल्या तरी सर्व सुत्र संजय गांधी यांच्या हातात होती. अशा वेळी अचानकपणे एका विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता. 

अशा वेळी संजय गांधींचा जागा कोण घेणार? इंदिरा गांधींचा राजकिय वारसदार कोण असणार असे प्रश्न पडणं स्वाभाविक होतं. तेव्हा उत्तर मिळालं. राजीव गांधी. 

राजीव गांधी पायलट होते. भारतीय राजकारणापासून ते कोसो दूर होते. अस सांगितलं जात की त्यांना राजकारणात यायची इच्छा नव्हती, पण संजय गांधींच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. 

संजय गांधीच्या मृत्यूनंतर अमेठी मधून राजीव गांधी मैदानात उतरले. या दरम्यान न्यूज एजेंसी असणाऱ्या AP न्यूज ने डॉक्यूमेंटरी अमेठी लोकसभा उपचुनाव नावाने एक डाक्युमेंटरी बनवली होती. २०१६ साली ती युट्यूबवर पब्लिश करण्यात आली. ज्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्याचसोबत संजय गांधींच्या पुर्वीचे फुटेज दिसते. 

डॉक्युमेंट्रीच्या सुरवातीलाच राजीव गांधी अमेठीच्या विजयाबद्दल जनतेच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसतात. सुरवातीच्या काळात अंग चोरुन असणारा त्यांच्या स्वभाव व्हिडीओ पाहताना सहज लक्षात येतो. 

या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेठीत प्रचार करताना संजय गांधी दिसतात. त्यानंतर संजय गांधीच्या अंतिम दर्शनास उपस्थित असणाऱ्या इंदिरा गांधी दिसतात. संजय गांधी यांची अंतिमयात्रा दिसते तर सोबतच गांधी परिवाराशी संबधित असणारे विवादित गुरू धीरेंद्र ब्रम्हचारी देखील दिसतात. 

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्या प्रचारासाठी अमेठीच्या रस्त्यावर उतरलेल्या इंदिरा गांधी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्याच सोबत या डॉक्युमेंट्रीमध्ये राजीव गांधी यांची छोटी मुलाखत आहे ज्यामध्ये ते अमेठीसाठी पाणी, रस्ते यांची गरज असल्याचं सांगतात. 

व्हिडीओ संपतो तेव्हा अमेठी मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबत शरद यादव यांच्यासाठी प्रचार करताना दिसतात. सोबतच तरुणपणीचे मुलायम सिंह यादव देखील दिसत आहेत. या निवडणुकीत राजीव गांधी यांच्या विरोधात चौधरी चरण सिंह यांच्या लोकदल पक्षामार्फत शरद यादव यांनी निवडणुक लढवली होती.

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here