असा झाला राजेश्वर प्रसादचा राजेश पायलट !!

तर भिडू लोक हा किस्सा आहे राजेश पायलट नवाच्या ध्येयवेडया माणसाचा. राजेश पायलट यांचा संपूर्ण जीवन धडाडीचं होता. राजेश पायलट यांचा जन्म यू.पी. मधील गाझियाबादच्या एका छोट्याश्या गावातला. त्यांचं मूळ नाव राजेश्वरप्रसाद पण घरी सगळे राजेश म्हणायचे.

वडील मिलिट्रीत शिपाई होते. घरात शेतीचं वातावरण होते. वडीलांची इच्छा होती की राजेशने भरपूर शिकून मोठे नाव कमवावे. राजेश ही आज्ञाधारक होते त्यांनी ही वडीलांना शब्द दिला शिकून यशस्वी होण्याचा. त्यांनी मनापासून अभ्यास केला. प्रथम ते सैन्यात भरती झाले लगेचच भारतीय वायू दलात ही त्यांची निवड झाली अणि तिथ ते रुजू झाले.

गाझियाबाद वरून दिल्लीला शिकण्यास आल्यानंतर सुरवातीचा काळ त्याच्यासाठी संघर्षाचा होता. शिक्षण घेत असताना ते आपल्या चुलत भावाबरोबर एका डेअरीत राहत होते. याच काळात राजेश ल्युटीयनस दिल्ली जिथे अनेक मंत्री, खासदार राहतात त्या भागात दूध वाटत असत.

तर भिडू लोक आत्ता तुम्हाला खरा किस्सा सांगतो राजेश्वर प्रसाद, राजेश पायलट कसे झाले याचा .

राजेश हे भारतीय वायुदलात फायटर पायलट होते. त्यांनी  १९७१ सालचे युद्ध हि लढले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती दिल्लीला झाली . हाच तो काळ होता राजेशजी आतून  अस्वस्थ होते. त्यांना सामान्य लोकासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी वायुदलातील आपली अधिकारी पदाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला घरातून बराच विरोध झाला पण राजेश यांचा  निर्णय झाला  होता.

दरम्यानच्या काळात राजेशजी गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय झाले होते. त्यांना आणि संजय गांधीना जोडणारा धागा महणजे कॅप्टन राल्फ. कॅप्टन राल्फ यांनीच सुरवातीच्या काळात राजेशजीना विमान उडवण्याचे धडे दिले होते , नंतरच्या काळात याच कॅप्टन राल्फ यांनी संजय गांधीना हि विमान उडवायला  शिकवले होते .

राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजेश इंदिराजींना भेटायला गेले. त्या काळात  पक्षासाठी जोखीम पत्करणाऱ्या  तरुणांना संजय गांधी व इंदिराजी प्रोत्साहन देत. राजेशजीनी  उत्तर प्रदेशच्या बागपत मधून लोकसभा लढवायला  आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याकाळी  बागपत मध्ये चौधरी चरण सिंग यांचा दबदबा होता. चौधरी चरण सिंग जाट समाजाचे मोठे नेते होते. नंतर ते पंतप्रधान ही झाले . इंदिराजींनी तेव्हा राजेशना विचारले होते,

“तुम्ही गुज्जर आहात तरीपण  तुम्हाला  जाठ बहुल भागातून निवडणुक का लढवायची आहे ? तिथे  हिंसा होण्याची शक्यता आहे तुम्हाला भीती वाटत नाही का ?”

राजेश ठामपणे उत्तरले जो बॉम्बला घाबरला नाही तो लाठ्यांना काय घाबरणार .

पण काही कारणास्तव त्यांना तिथून तिकीट मिळाले नाही. पण त्यांनी निराश न होता प्रयत्न चालूच ठेवले  शेवटी त्यांना भरतपूर राजस्थान मधून तिकीट देण्यात आले .

हा किस्सा भिडूनो तेव्हाचाच आहे. राजेशजीनां उमेदवारी अर्ज भरायचा होता. ते कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहचले . तोवर कार्यालयात इंदिराजींनी कोणीतरी पायलट पाठवला आहे याची जोरदार चर्चा सुरु होत्या.इतक्यात राजेशजी तिथे पोहचले अर्ज भरण्यास सुरवात झाली .सर्वांचा लक्ष या नवीन चेहऱ्याकडे लागलेले होता. राजेशनी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला आपले नाव  राजेश्वर प्रसाद असे सांगितले. ते एका कार्यकर्त्यांने ऐकले तो मागून ओरडलाच,

“साहेब इथे सर्वजन तुम्हाला पायलट  म्हणून ओळखतात ,तुम्ही राजेश पायलट या नावानेच निवडणुकीत लढा.”

राजेश हसून बोलले नाव काहीपण लिहितो खरं निवडून द्या. सर्वत्र हश्या पिकला. त्याठिकाणी मुळच्या राजेश प्रसाद यांनी राजेश पायलट नावाने अर्ज भरला व त्यानंतर त्यांचे  राजेश पायलट हेच नाव कायम राहिले .

राजेश पायलट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाचवेळा विविध मंत्रिपदं भूषवली . मंत्र्यांच्या घरी दुध वाटणारा पोरगा नंतर दीर्घकाळ त्यापेकीच एका बंगल्यात केंद्रीय मंत्री म्हाणून राहिला .हा प्रवास थक्क करणारा होता .जनतेच्या मनाला स्पर्श करण्याची कला पायलट यांना अवगत होती .त्यांची शैली नम्र व तितकीच बेधडक होती. राजेश पायलट यांच निधन ११ जून २००० साली एका ऍक्सिडेंट मध्ये झालं .

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here