इंदिरा गांधींच्या अंतीम क्षणी राजीव आणि राहूल गांधी “कलमा” पढत होते ..? 

Facebook

“इन्दिरा जी की शव के सामने राहुल और राजीव गांधी कलमा पढ रहे हैं ?फिर भी हमारे देश के लोगों को लगता है कि ये लोग ब्राह्मण हैं.”

फेसबुकवर एक फोटो सध्या जोरात व्हायरल झाला आहे. फोटोतलं हे वाक्य. इंदिरा गांधी यांच्या अंतीम क्षणी राजीव गांधी आणि राहूल कलम पढत होते. त्याचसोबत राजीव आणि राहूल हे ब्राम्हण नाहीत. ते हिंदू नाहीत तर ते मुस्लीमच आहेत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. 

https://www.facebook.com/humlog.co.in/photos/a.1029052007171503/2081262728617087/?type=3&theater

“हमलोक” या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोत “राजीव” आणि “राहूल” गांधींच्या हातावर गोल करण्यात आला आहे. त्यामध्ये दिसतं की राजीव गांधी आणि राहूल गांधी यांनी हिंदू पद्धतीने हात जोडले नसून त्यांनी मुस्लीम पद्धतीनुसार हात जोडलेले आहेत. 

आत्ता हमलोक या पेजची लिंक उदाहरणार्थ दाखल देण्यात आली आहे. अशा कित्येक फेसबुक व ट्विटर हॅन्डेलवर हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला हजारोंत शेअर, कमेंट, रिट्विट करण्यात आल आहे. 

हा फोटो इंटरनेटवर शोधल्यास सर्वात पहिल्यांदा फोटो,

https://www.skyscrapercity.com/showthread.php?p=135311390

या बेवसाईटवर पोस्ट केल्याचे दिसते. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफारखान यांच्या अंतीम क्षणातील हा फोटो असून राजीव गांधी, सोनिया गांधी, राहूल गांधी (१८ वर्ष) यांच्या सोबत सरहद्द गांधी यांच्या अंतीम क्षणी उपस्थित असल्याचे सांगितले गेले आहे. 

पाकिस्तानच्या वझिरेस्तानचे MP असणाऱ्या मोहसीन धवार यांनी आपल्या ट्विटर हॅन्डेलवरुन हाच फोटो दिनांक २७ जानेवारी २०१६ रोजी ट्विट केला होता, त्यामध्ये बच्चा खान (सरहद्द गांधी) यांच्या अंतीम क्षणी राजीव गांधी, सोनिया गांधी आणि नरसिंह राव उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. 

२० जानेवारी १९८८ रोजी सरहद्द गांधी यांचे निधन झाल्यानंतर पेशावर येथे राजीव गांधी आपला मुलगा राहूल गांधी व नरसिंह राव यांच्यासह उपस्थित होते अस, न्युयॉर्क टाईम्सच्या लेखात सांगण्यात आलं आहे. 

आपण न्युयॉर्क टाईम्सचा लेख.

https://www.nytimes.com/1988/01/21/obituaries/abdul-ghaffar-khan-98-a-follower-of-gandhi.html इथे क्लिक करुन वाचू शकता. 

इंदिरा गांधी यांच निधन ३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी झालं होतं. तेव्हा राहूल गांधी १४ वर्षांचे होते, त्यांचा हा फोटो खरा फोटो. 

इंदिरा गांधी यांच्या अंतीम क्षणी राहूल गांधी.

तर खान अब्दुल गफार खान अर्थात सरहद्द गांधी यांचे निधन २० जानेवारी १९८८ रोजी झालं होतं तेव्हा राहूल गांधी यांच वय १८ वर्ष होतं. 

गांधी घराण्याच्या इतिहासाबद्दल जाणुन घेण्यासाठी,