प्रियांका गांधी गळ्यात क्रॉस घालतात का ? काय आहे वायरल फोटो मागचं सत्य.

मंगळसूत्र हे हिंदू विवाहित स्त्रीचं लक्षण. पण सध्या निवडणुकीच्या धामधुमित एका मंगळसूत्राच्या आणि गळ्यातल्या क्रॉसची चर्चा जोरात सुरु आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या फोटोत प्रियांका गांधी यांनी मंगळसुत्रा ऐवजी क्रॉस घातल्याचं दिसत. नेमक या पाठीमागचं सत्य काय ते जाणून घेऊ.

सोशल मिडियावर सध्या वायरल होत असलेल्या या फोटोवर एक कॅप्शन टाकण्यात आलं आहे ते असं,

“जानव घालणाऱ्या दत्तात्रय ब्राह्मणाची बहीण, गळ्यात मंगळसुत्रा ऐवजी क्रॉस घालते, आणि स्वत:ला गंगा की बेटी म्हणवते”

आणि या पुढे एक नंबर की फर्जी चोरी करके बेल पे रेहने वाली फमिली असं लिहण्यात आलं आहे.

हा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यावरून उलटसुलट चर्चा देखील चालू झाल्या आहेत. modi government नावाच्या एका फेसबुक पेज ने हा फोटो पोस्ट केला आणि तिथून पुढ यावर चर्चा रंगू लागली. अनेक सोशल मिडिया पेजवर हा फोटो शेर करण्यात आलाय.

२९ मार्च ला हा फोटो modi government या पेजवर दुपारी एक वाजता शेअर करण्यात आला होता. त्यापूर्वीच म्हणजे सकाळी ११ च्या सुमारास हा फोटो मंजीतसिंग बग्गा या फेसबुक प्रोफाइलवर पण टाकण्यात आला होता. इथून तो सगळ्यात जास्त शेअर झाला. या फोटोवरून प्रियांका गांधी ख्रिश्चन असून त्या हिंदू नसल्याच्या वादाला तोंड फोडण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना या फोटोवरून प्रियांका गांधी आणि त्यांच्या परिवाराला ट्रोल देखील केल जातय. हाच फोटो अनेक  twitter account वर देखील पोस्ट करण्यात आला आहे.

फोटोचं सत्य नेमक काय?

हा मूळ फोटो जेव्हा रिव्हर्स सर्च केला गेला, तेव्हा लक्षात आलं कि हा फोटो २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीतला आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली इथे १७ फेब्रुवारी २०१७ मधील एका प्रचार फेरीतला हा फोटो आहे. या प्रचार फेरीमध्ये प्रियांका गांधी यांनी एक लॉकेट घातल आहे. याच फोटो मध्ये फोटोशॉप करून त्या लॉकेट ऐवजी क्रॉस दाखवण्यात आलं आहे.

स्क्रिनशॉट

या प्रचार फेरीचा हा फोटो त्यावेळेस अनेक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅऩेलनी देखील दाखवला होता पण त्यात कुठेच प्रियांका गांधी यांच्या गळ्यात क्रॉस असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच हा फोटोच फेक असल्याचे सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here