पॉर्न फिल्मला “ब्लू फिल्म” का म्हणायचं ? कधीतरी हे पण समजून घ्या.

पेपरमध्ये, टिव्ही किंवा चार चौघाच्यात जेव्हा कधी पॉर्न फिल्मचा उल्लेख होतो तेव्हा अशा फिल्मला ब्लू फिल्म म्हणलं जात. ब्लू फिल्मचाच अपभ्रंश म्हणजे बीपी. आत्ता बीपीचे देखील बिस्किट पुडा सारखे अपभ्रंश तयार झाले, पण ब्लू फिल्म हे सर्वमान्य मिडीयातला शब्द.

पण हा ब्लू फिल्म नावाचा शब्द नेमका आला तरी कुठून ? 

त्याआधी सर्वात प्रथम जगाच्या पाठीवर पॉर्न फिल्मला ब्लू फिल्म अस कुठल्या देशात म्हणलं जात याच उत्तर देणं महत्वाच आहे. तर ब्लू फिल्म असा उल्लेख भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान इतक्याच देशांमध्ये केला जातो. आत्ता आपल्याच भागात ब्लू फिल्म का म्हणतात ?

याच उत्तर शोधणं मनोरंजनाच्या पातळ्यांवर ऑरगॅजम मिळवून देणारं ठरू शकतं. 

ब्लू फिल्मच्या उल्लेखाबाबत अनेक सामाजिक अभ्यासकांच्या वेगवेगळ्या थेअरी आहेत. अशा अभ्यासकांना आपण साधारण पुड्या सोडणारे अभ्यासक म्हणतो. पहिला आपण त्या थेअरींचा अभ्यास करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करुया. 

१) पहिल्या पॉर्न सिनेमाचं नाव ब्लू होतं –  

सर्वसामान्यांना माहित असणारी हि थेअरी विशेष लोकप्रिय आणि डोक्याला ताप न देणारी आहे. कदाचित याच कारणामुळे ती लोकप्रिय झाली असावी. मात्र गुगल पासून ते इतिहास अॅकडमीपर्यन्त कुठेच पहिल्या पॉर्न फिल्मच नाव ब्लू फिल्म असल्याचे दाखले मिळत नाहीत साहजिक हि थेअरी तितकीच तकलादू आहे. 

२) पोस्टरवरती निळ्या रंगाचा उपयोग –  

अभ्यासकांच्या मते पॉर्न कंटेंट असणाऱ्या सिनेमाचे पोस्टर निळ्या रंगात असत. त्याचं मुख्य कारण म्हणजे निळा रंग लगेच नजरेत भरतो. पण सायन्स अस सांगत की, लाल आणि पिवळा रंग नजरेत लगेच भरतो. मग निळा रंग का ? तर निळा रंग हा कोणत्याही रंगासोबत लवकर मिक्स होतो म्हणून. थोडक्यात सांगायच झाल तर अभ्यासक निळा रंग पॉर्न फिल्मच्या पोस्टवर उपयोगात आणला जात असल्याचे दाखले ओढून ताणून लावतात मात्र खर सांगायच झालं तर जुन्या काळातच काय आजच्या काळात देखील पॉर्न फिल्मसाठी निळाच रंग वापरल्याचे दाखले मिळत नाहीत. 

हे ही वाचा –

३) निळ्या रंगाच्या पॉकिटांमध्ये रिळ पॅक करण्याची थेअरी –  

हि थेअरी सांगते कि निळ्या रंगाच्या पॅकेटमधून पॉर्न फिल्मच्या रिळ सिनेमागृहात घेवून जात असत. इतिहासाच्या पानांवर मात्र या थेअरीबद्दल कोणतेच लिखीत पुरावे मिळत नाहीत. काहीजण तर अशाही पुड्या सोडतात की ज्या व्हिडीओ पार्लर मध्ये ब्लू फिल्मची कॅसेट मिळत असे ते कपाट निळ्या रंगाचे असे त्यामुळे अशा फिल्मना ब्लू फिल्म म्हणत असत. पण हि थेअरी देखील तितकीच बाळबोध वाटते. 

४) निळ्या रंगाची चित्रफित –  

हि थेअरी जास्तीत जास्त जवळ जाणारी आहे. या थेअरीमध्ये जो पाया वापरला आहे तो पॉर्न फिल्मच्या कमी खर्चाचा आहे. या दमदार पायाभरणीमुळेच हि थेअरी टिकावू वाटते. तर पॉर्न फिल्म या कमी खर्चात होत असत. साहजिक जेव्हा रंगीत सिनेम बनू लागले तेव्हा पॉर्न फिल्मच्या निर्मात्यावर देखील रंगीत सिनेमा करण्यासाठी दबाव वाढू लागला. अशा वेळी कमी खर्चात रंगीत चित्र दाखवण्यासाठी निर्मात्यांनी नवी आयडिया निर्माण केली. ती आयड्या होती काळ्या आणि पांढऱ्या रंगाबरोबर निळ्या रंगाचा वापर करणं. फिल्म जेव्हा दाखवली जात असे तेव्हा प्रोजेक्टरमधून निळ्या रंगाची छटा देखील पाडण्यात येवू लागली. परिणामी फिल्म नुसती काळी पांढरी न दिसता निळी देखील दिसू लागली. यातूनच ब्लू फिल्म नावाची उत्पत्ती झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.हि शक्यता निदान मनाला पटण्यासारखी तरी आहे. 

५) ब्लू अॅक्ट –  

हे कारण सर्वात जवळच. ठामपणे आणि पुरावे असणार आहे. जेव्हा भारतावर इंग्रजाचं शासन होतं तेव्हा ब्लू अॅक्ट नावाचा एक कायदा अंमलात आणलेला होता. हा तसा धार्मिक नियम होता. या नियमानुसार रविवारच्या दिवशी चर्च भरत असत. या दिवसाला पवित्र दिवस मानून कोणत्याही वाईट गोष्टी करू नयेत असा अलिखित नियम इंग्रज पाळत असत. त्याच कारणाने दारू पिणं, अनैतिक कृत्य करण यांसारख्या गोष्टी करणं म्हणजे ब्लू अॅक्टच अल्लंघन करण अस मानलं जावू लागलं व त्यातूनच पॉर्न सिनेमा पाहण्यासाठी ब्लू हा शब्द जोडला गेला. 

या झाल्या पॉर्न फिल्मला ब्लू फिल्म नाव का पडलं याच्या थेअरी. यातील शेवटच्या दोन थेअरी पटतात. त्यांचे पुरावे देखील सापडतात त्यामुळे शेवटची दोन्ही कारणं तुम्ही मित्रांच्या मैफिलीत बिनधास्तपणे ठोकून देवू शकता.

हे ही वाचा –  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here