नरेंद्र मोदींनी पुण्याच्या समाजवाद्यांवर जोक केला, वाचा वाचा. 

काल झालेल्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीच वातावरणं संपल त्याला कारण नरेंद्र मोदींची आज सकाळी आलेली मुलाखत. या मुलाखतीत राजकीय चर्चा झाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे आहेत. ते आंबे कसे खातात. ते किती वेळ काम करतात. त्यांच्या आयुष्यात ह्यूमरला काय महत्व आहे वगैरे वगैरे टाईप चर्चा सुरू झाल्या. 

अभिनेता अक्षयकुमारने खाजगी प्रश्न विचारले. या दरम्यान नरेंद्र मोदी आणि अभिनेता अक्षयकुमार खुलून एकमेकांशी गप्पा मारत होते. आपण किती त्याग केला आहे. आमदार म्हणून मिळालेला प्लॉट आपण पक्षासाठी कसा दिला. आपल्याकडची खाजगी रक्कम आपण कशी दान केली याबाबत नरेंद्र मोदी अक्षयकुमारला सांगू लागले.  

इथपर्यन्त वातावरण सुखासुखी चालू होतं. पण अक्षयकुमारने प्रश्न विचारला  एक गुजराती असून पैशाचा त्याग करणं कस जमतं. अक्षयकुमार इथवरच न थांबता म्हणाला की, मी यावर एक जोक सांगतो आणि अक्षयकुमारने जोक सांगितला, 

तो म्हणाला, 

एक गुजराती व्यापारी अंतीम क्षणात असतो. तो झोपलेला असतो आणि सगळे नातेवाईक त्यांच्या शेजारी गोळा झालेले असतात. तो व्यापारी विचारतो माझा मुलगा कुठे आहे. मुलगा म्हणतो इथेच आहे. मुलगी कुठे आहे. मुलगी म्हणते इथेच आहे. बायको कुठे आहे. बायको म्हणते इथेच आहे. त्यावर तो व्यापारी म्हणतो, सगळे इथेच आहेत तर दुकानात कोण आहे? 

हा जोक सांगून अक्षयकुमार म्हणाला, गुजराती लोकांना आपले पैसे प्रिय असतात. आत्ता जोक सांगण्याची वेळ होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 

नरेंद्र मोदी म्हणाले मी एक जोक सांगतो, 

मोदी म्हणाले, 

एकजण रेल्वेतून जात असतो. तो वरती बर्थवर बसलेला असतो. तो माणूस खालच्या माणसाला विचारतो, कोणतं स्टेशन आलं. खालचा माणूस म्हणतो पंचवीस पैसे दे सांगतो. तेव्हा वरचा माणूस म्हणतो मला कळालं अहमदाबाद आलं. 

पहिल्या सेकंदात अक्षयकुमारला हा जोक कळाला नाही. नंतर कळाला अक्षयकुमार हसला. इथपर्यन्त सगळं ठिक होतं. 

पण काय झालं आत्ता नरेंद्र मोदींना अजून एक जोक सांगू वाटला, आणि त्यांनी चक्क पुण्यातल्या समाजवाद्यांवर जोक केला. 

मोदी म्हणाले, 

सुरवातीच्या काळात मी भारतभर फिरत असायचो. दाढी वाढलेली असायची. हाफ सिव्हचा कुडता, शबनम अशा अवतारात मी फिरायचो. माझ्याकडं जास्त सामानं नव्हतं. मी आपला छोटासा झोला घेवून पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरलो. तिथून मला RSS च्या कार्यालयात जायचं होतं. मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि चालू लागलो. शे-दोनशे मीटर पुढं आलो तर लक्षात आलं एक रिक्षावाला माझ्या पाठीमागून माझ्याच स्पीडमध्ये येतोय. 

मी त्याला विचारलं अस का? रिक्षात काही प्रोब्लेम आहे का? 

त्यावर रिक्षावाला म्हणाला, साब आप नहीं बैंठोगे. 

मोदी म्हणाले, नहीं. 

त्यावर रिक्षावाला म्हणाला, आप समाजवादी नहीं हों. 

मोदी म्हणाले, नहीं मैं तो अहमदाबादी हूं. लेकिन ऐंसा क्यू समाजवादी क्यू. 

त्यावर रिक्षावाला म्हणाला, समाजवादी लोगं हमारे पुणे समाजवादी लोग हैं वो स्टेशनमें पब्लिकके सामने रिक्षामे नहीं बैठतें हैं. दूर जाकें गुपचूप बैंठ जाते हैं. 

पुढे मोदी म्हणाले, लोगोंमें इप्रेशन रहें की वो मेहनत करतें हैं सादगी वाले हैं. 

जोक तर भारी होता पण अक्षयकुमारला कळला नाही. त्यानंतर अक्षयकुमारने चालत चालत ही मुलाखत पुढे घेवून जाण्याचा निर्णय घेतला. 

असो, तर नरेंद्र मोदींनी हा जोक सांगण्यापुर्वीच किसी की आलोचना करनें के लिए नहीं हे स्पष्ट केलं आहे.

तुम्हाला हा जोक तुमच्या कानाने ऐकायचा असेल तर खालील लिंकवर २५-२६ मिनटानंतर पहायला चालू करा. 

हे ही वाच भिडू.