त्याला फास्टर म्हणायचं की स्पिनर हे रहस्य अजून उलगडलेलं नाही.

जगात असे अनेक गोलंदाज आहेत जे आपल्या वेड्यावाकड्या गोलंदाजीच्या शैलीमुले कायम चर्चेत राहिले आहेत. पण इंग्लंड मधील केंट शहरात आजपासून ७३ वर्षाआधी एका अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा जन्म झाला होता, तो वेगवान होता कि फिरकी हे आजपर्यंत कुणी ओळखू शकले नाही. त्या खेळाडूचे नाव आहे डेरेक अंडरवूड,

आजपासून ७३ वर्षाआधी अंडरवूड इंग्लिश क्रिकेट संघाचे सर्वात रहस्यमयी गोलंदाज होते. सहसा फिरकी गोलंदाज एक किंवा दोन पावले धावत येऊन गोलंदाजी करतात पण अंडरवूड मध्यम गती गोलंदाजाइतके धावत यायचे आणि चेंडू फेकायचे. त्यांची हीच कला त्यांना सगळ्यांहून वेगळ बनवत होती. इएसपीएन क्रिकइन्फोच्या रेकॉर्डमध्ये अंडरवूड यांना स्लो लेफ्ट आर्म ओर्थोडोक्स गोलंदाज म्हटल आहे.

शेवटच्या क्षणी घ्यायचे विकेट

११२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या डेरेक अंडरवूडच्या गोलंदाजीची आणखी एक खासियत होती, ती म्हणजे शेवटच्या क्षणी विकेट काढून ते आपल्या संघाला विजय मिळवून देत. असे त्यांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा करून दाखवल आहे.

१९६८ ची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला आला होता. सुरुवातीच्या चार सामन्यांत यजमान इंग्लंड संघाला जिंकता आले नाही पण, जेव्हा शेवटचा सामना खेळायला ते ओवेल मैदानावर उतरले तेव्हा चित्र काही वेगळेच होते. चौथ्या पारीत ऑस्ट्रेलियाला ३५२ धावांचे लक्ष्य मिळालेले.

गळ्यांना वाटत होते कि, ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहजपणे गाठून सामना जिकून घेईल. पण इंग्लिश गोलंदाज अंडरवूडने अशी काही जादू चालवली कि, ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ १२५ धावांवर बाद झाला. इंग्लंडने हा सामना २२६ धावांनी जिंकला होता, पण हा विजय त्यांना शेवटच्या पाच मिनिटांत मिळाला होता. अंडरवूडने पारीच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा १०वा गडी बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

अशी होती आंतरराष्ट्रीय कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेट रेकॉर्डनुसार डेरेक अंडरवूड एकाच सेशनमध्ये कमी वयात १०० विकेट घेणारे गोलंदाज आहेत. त्यांनी हा कारनामा वयाच्या १८व्या वर्षीच करून दाखवलेला. इतकेच नाहीतर वयाच्या ३९व्या वर्षी केंट कडून खेळतांना फर्स्ट क्लास शतक सुद्धा झळकावले होते.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दचे म्हणाल तर, अंडरवूडने ८७ कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात देखील २६ सामन्यात ३२ विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. १९८२ साली अंडरवूडने क्रिकेट विश्वाचा निरोप घेतला.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here