विठ्ठलाच्या पूजेसाठी “मानाचे वारकरी कसे ठरवतात” ? 

यंदाच्या शासकीय पुजेचा मान हा वारकऱ्यांचा अस सांगत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर आटोपती पुजा घातली. विठ्ठल प्रसन्न होईल का नाही ते २०१९ ला कळेलच तुर्तास आपण याकडे लक्ष दिलं पाहीजे कि हे विठ्ठलाची पुजा करणार हे मानाचं दांपत्य कोण होतं ? 

या वर्षा विठ्ठलाची पुजा करण्याचा मान हा हिंगोलीच्या वर्षा आणि अनिल जाधव यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच नाव आणि मानाचे वारकरी ठरलेल्या वर्षा जाधव याचं नाव एक असावं हा एक योगायोगच. 

तर मुद्दा असा आहे की, हे मानाचे वारकरी ठरवतं कोण ? आणि कस ? 

मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पुर्णपणे मंदिर समितीला आहे. शासकिय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे. 

मानाचे वारकरी कसे निवडले जातात ? 

विठ्ठलाची पुजा हि पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो. 

 

मुख्यमंत्र्यांची वारी ! किस्से लय भारी !!

शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनि समृद्ध केलाला मार्गय हा वारीचा..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here