केतकरांना राज्यसभेची ऑफर सर्वात आधी बाळासाहेबांनी दिली होती…

KUMAR KETKAR

मोदी सरकार सत्तेवर येण्याअगोदर बऱ्याच मुरलेल्या पत्रकारांना काँग्रेसच्या पतनाचा काळ आणि मोंदींचा उदय जवळ आलाय दिसतं होतं. ऐऱ्हवी सगळा मिडीया अंबानी समूहाच्या ताब्यात जात असल्यामुळे मोदींच्या लाटेचं चांगलं दर्शनही घडत होतं. त्यामुळे बरेच जुने पत्रकार याची मिमांसा ‘आपल्या देशात हिटलर येणारय का‘ अशीही करत होते. पण येवढं काँग्रेसच्या पुलाखालून पाणी गेल्यावरही, काँग्रेसच्या ऐतिहासिक आणि धोरणात्मक चूकांचा उल्लेख टाळत एका आभासी हिटलरचा भयगंड कुरवाळत बसण्याचे काही पत्रकार जोमानं काम करत होते. आणि काँग्रेसच्या पतनाच्या काळात डँमेज कन्ट्रोल करावं तसं नेहरूंची आयडीया ऑफ इंडीयावर बोलत होते. काँग्रेस हीच या देशातली खरी लाईन आहे असंही वारंवार सांगत होते.

अश्याच एका लेक्चरला मी उपस्थित होतो. या पत्रकार संपादकांना आपल्या दूरदृष्टीवर एवढा विश्वास होता की,  २०१४ ला देखील काँग्रेस सत्तेवर येणारैय असंच वाटत होतं. पण असं नेमक या जेष्ठ पत्रकार संपादकांना का वाटत होतं, यावर मला बऱ्याच इतर तरूण पत्रकारांच्या गप्पा माहित होत्या.

म्हणून या लेक्चरचा शेवटचा प्रश्न मी विचारला, ” बरं सर, ते सगळं ठिक आहे, पण तुम्ही राज्यसभेवर यंदा तरी जाणार आहात का” .. आणि मी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला म्हणून हशा पिकला…

संपादक महोदय जरा बावचळे आणि सांगायला लागले की, मला कशी राज्यसभेवर जाण्याची ऑफर पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती, पण मी गेलो नाही, मला राज्यसभेवर जायचंय हे खरं नाही, वैगरे वैगरे…
त्या आदरणीय जेष्ठ संपादकांचं नाव होतं, द ओन अँन्ड ओनली कुमार केतकर….

केतकर सरांना आज राज्यसभेवर जातानाची बातमी येऊन धडकली आणि हे सरकून डोळ्यांसमोरून गेलं. ते जेष्ठ आहेत त्यामुळे त्यांचं अभिनंदन. अजून किती ज्येष्ठांचं मोदींच्या काळातच किती अभिनंदन करावं हाही मुद्दा आहेच.

खासदार कुमार केतकरांना पुढील वाटचालीस कुबेरांनी मागे घेतलेल्या संपादकीय एवढ्या शुभेच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here