या राष्ट्रपतींच्या लव्ह मॅरेजसाठी नेहरूंनी “खास परवानगी” दिली होती. 

कोचेरिल रामन नारायणन के.आर. नारायणन या नावाने आपणाला ते माहित आहेत. ते भारताच्या विदेश सेवेत होते. पुढे ते भारताचे राष्ट्रपती झाले. ते पहिले दलित राष्ट्रपती होते. ते मल्याळम होते. आणि ते हूशार होते. त्यांच्याबद्दल कोणाला विचारलं की सर्वसाधारण इतकीच माहिती असते. 

पण, ते हे राष्ट्रपती जिंदादिल व्यक्ती होते. त्याच जिंदादिलीचा हा किस्सा.

तो काळ होता १९४८ चा. नुकताच भारत स्वतंत्र झालेला होता. ब्रिटीश शासन गेले होते. संविधान निर्मितीच काम चालू होतं. साप आणि गारुड्यांचा हा देश भविष्यात काय करणार असा प्रश्न जगाच्या व्यासपीठावर होता तर इकडे भारत नव्या जगाची स्वप्न पहात होता. संविधानाची निर्मीती होवून देशात निवडणूका होणार होत्या. तोपर्यन्त पंडित जवाहरलाल नेहरू देशाची घडी बसवत होते. 

याच काळात एक २८ वर्षाचा तरुण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेवून भारतात परतला होता. त्या विद्यार्थांचा उल्लेख एक तल्लख बुद्धीचा भारतीय मुलगा म्हणून केला जात असे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेत असताना त्याचा संबध आला तो इंग्लडचे प्रसिद्ध राजकिय विश्लेषक हेराल्ड लास्की यांच्यासोब. हेरॉल्ड लास्की यांचा तो सर्वात आवडता विद्यार्थी होता.

हेरॉल्ड लास्की यांनी दिलेल्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपुर्ण लिखाण करणं आणि त्यांची शाबासकी मिळवणं असे हे संबध निर्माण झाले होते. जेव्हा हा तरुण भारतात परत येण्यास निघाला तेव्हा डॉ. हेरॉल्ड लास्की यांनी पंडित नेहरूंच्यासाठी एक चिठ्ठी लिहली. ती चिठ्ठी घेवून पंडित नेहरूंची भेट घेण्यास त्या तरुणाला सांगितलं. 

हा तरुण म्हणजे के.आर नारायणन. के.आर. नारायणन भारतात आले. पंडित नेहरूंनी भेटण्याचा प्रयत्न करु लागले पण पंतप्रधानांसोबत खाजगी भेट हि अशक्य गोष्ट होती. अनेक प्रयत्नानंतर त्यांची भेट फिक्स झाली. के.आर नारायणन ती चिठ्ठी घेवून पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटण्यास गेले. 

गंभीरपणे डॉ. हेरॉल्ड लास्की यांची ती चिठ्ठी पंडित नेहरूंनी वाचली आणि नारायण यांना मिठ्ठी मारली. त्यांनी नारायणन यांना विचारलं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीशी संबध आला का? 

त्यावर नारायणन म्हणाले हो,

तिथे असताना मी सोशल डेमोक्रेट्स सोबत होतो.

नेहरूंना हे उत्तर आवडलं आणि त्यांना भारतीय विदेश सेवेत त्यांची नियुक्ती केली. 

परराष्ट्र सेवेतील पहिलीच नियुक्ती त्यांची रंगूनमध्ये करण्यात आली. ते ब्रम्हदेश(म्यानमार) मधील भारतीय दूतावासात काम करु लागले. 

आत्ता साल होतं १९५२ चं.

ब्रम्हदेशातील एक तरुणी दिल्लीच्या दिल्लीच्या दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क मधून पास होवून ब्रम्हदेशात परतली होती. परराष्ट्र संबध, विदेश निती या विषयात तिला इंटरेस्ट होता. लास्की यांचे विद्यार्थी भारतीय दुतावासात काम करतात अशी माहिती त्यांना मिळाली. त्या विद्यार्थाला अर्थात के.आर.नारायण यांना भेटण्यासाठी त्या भारतीय दुतावासात आल्या. त्यांची भेट झाली चर्चा झाली व पुढे मैत्री झाली. 

के.आर नारायण आणि त्यांचे हे संबध मैत्री आणि मैत्रीतून प्रेमाच्या नात्याकडे गेले. पण सर्वात मोठ्ठा प्रश्न होता तो लग्नाचा. विदेश सेवेत असणाऱ्या कोणत्याच व्यक्तीच विदेशी व्यक्तिसोबत लग्न करता येणार नाही असा नियम होता. के.आर. नारायणन यांनी मोठ्या विश्वासाने हे “प्रकरण” नेहरूंपर्यन्त पोहचवलं. नेहरूंनी देखील मोठ्या आनंदाने के.आर. नारायणन यांना स्पेशल परमिशन म्हणून परवानगी दिली. लग्नानंतर त्या उषा नारायणन् झाल्या. 

पुढे के.आर. नारायण यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. जपान, तुर्की, चीन, अमेरिकेत त्यांनी IFS म्हणून काम पाहिलं. पुढे ते भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव देखील झाले. पुढे ते इंदिरा गांधी व राजीव गांधीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले व दिनांक २५ जुलै १९९७ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. 

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here