पाकिस्तानमध्ये लपून बसलेले हे पाचजण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहेत.

काल मसुद अजहर याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून आतंराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले. पुलवामा हल्यानंतर मसुद अजहर याला आंतराष्ट्रीय पातळ्यांवर दहशतवादी घोषीत करण्यासंबधात भारताने हालचाल सुरू केली होती. याला सुरवातीस असणारा चीनचा विरोध मावळला. आणि अखेर मसुद अजहर याला आतंराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले.

तरिही एक प्रश्न उरतो तो म्हणजे, पाकिस्तानमध्ये असे कोणकोणते आतंकवादी आहे, जे भारताला कोणत्याही परिस्थितीत ताब्यात हवेत आहेत.

1. दाऊद इब्राहिम. 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. भारताच्या रडावर असेलला मोस्ट वॉटेड. भारतातील पोलिसांना सातत्याने हैराण करून सोडणारा. कितीतरी गुन्हांचे आरोप त्यांच्यावर आहेत. १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटचा सुत्रधार म्हणून दाऊद इब्राहिम आरोप आहेत. या साखळी बॉम्बस्फोटामध्ये २५७ लोक मारले गेले होते तर ७०० हून जास्त लोक जखमी झाले होते.

असे कितीतरी आरोप दाऊदवर आहेत. हाच मोस्ट वॉटेड डाँन सध्या पाकिस्तानमध्ये राहतो. भारताने याबाबत अनेक वेळा आवाज उठवला आहे मात्र पाकिस्ताननं त्याला नकार दिला आहे.

  2. हाफिज सईद. 

लष्कर- ए- तोयबा या पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. २००८ साली मुंबईतील ताज हाँटेलवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमांईड. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देणाऱ्याला १ कोटी अमेरिका डाँलर २०१२ साली घोषीत केलेलं आहे. हा सुद्धा पाकिस्तानात सध्या राहतो.

मात्र सबळ पुराव्याअभावी पाकिस्तान कोर्टानं सईदला सोडून दिलं आहे. त्याच्याविरूद्ध कोणताच पुरावा नसल्यामुळं तो पाकिस्तानमध्ये फिरू शकतो, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.

3. सैयद सलाहुद्दीन. 

सैयद सलाहुद्दीन हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. काश्मीरमधील कारवाईमध्ये त्याच्य़ा हात असल्याचं सातत्यानं समोर आलं आहे.  भारत विरोधी अतेरिकी संघटनेचा तो अध्यक्ष सु्द्धा राहिलेला आहे.

काश्मिरमध्ये शांतता नांदवण्याच्य़ा कोणत्याच मुद्दाला यशस्वी होऊ देणार नाही, अशी शपथ सैयद सलाहुद्दीन खाल्लेली आहे.

२०१७ साली अमेरीकेच्या विदेश मंत्रालयानं त्याला जागतिक आंतकवादी म्हणून घोषीत केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये राहून काश्मिरमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी सैयद सलाहुद्दीन प्रोत्साहन देत आहे.

4. मौलाना मसूद अजहर

नुकताच पुलवामामध्ये भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली होती. त्या संघटनेची स्थापना मौलाना मसूद अजहर याने केलेली आहे. २००१ साली संसदेवर केलेल्य़ा हल्ल्याचा आरोप मसूद अजहरवर आहे.

१९९९ ला कंधार विमान अपहरणाच्या बदल्यात मसूद अजहरला सोडण्यात आलं होतं. मध्यंतरी मसुद मेल्याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केलं होतं. नुकतच त्याला आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं.

5. झकीउर रहमान लखवी. 

मुंबई हल्ल्यांचा मास्टरमांईड म्हणून झकीउर रहमान लखवी यांच्यावर आरोप आहे. झकीउर रहमान लखवी जिहादसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम करतो. 15 ते 20 वर्षे वयोगटातील पाकिस्तानी युवकांना भारताविरुद्ध जिहादमध्ये भाग घेण्यासाठी-बलिदान करण्यासाठी प्रोत्साहन देतो.

 

हे ही वाचा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here