ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठा साम्राज्य असतं, काय आहे थरुर थेअरी. 

केरलमध्ये मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर भरवण्यात येते. ३१ जानेवारी २०१९ रोजी या फेस्टिवलसाठी शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी शशी थरूर यांनी Era Of Darkness then And Now या विषयावर संवाद साधला. 

शशी थरुर यांना या कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारण्यात आले. त्यातील महत्वाचा प्रश्न होता ब्रिटीश भारतात आले नसते तर. याच उत्तर देताना ब्रिटीश भारतात नसते तर मराठा साम्राज्याच्या हाती भारताची सत्ता असती असे ते म्हणाले ते नेमकं काय म्हणाले तर. 

प्रश्न. 

जर ब्रिटिश भारतात आलेच नसते, भारत जर ब्रिटिशांची वसाहत बनलाच नसता तर भारत आज आहे तसाच असता का ?

शशी थरूर.

जर ब्रिटिश आले नसते तरी दुसऱ्या कोणत्यातरी युरोपियन सत्तेने आपला देश ताब्यात घेतलाच असता कारण एक देश म्हणून आपल्याकडे सैन्याची ताकद खूप कमी होती .

पण जर एक काल्पनिक/ प्रतिकात्मक परिस्थितीत मान्य केली की जर भारत कधीच कुठल्या युरोपियन देशांच्या पारतंत्र्यात गेला नसता तर आपला देश कसा असता.

ब्रिटिशांच्या येण्यामुळे जर भारताच्या इतिहासात सर्वात महत्वाची घटना कोणती घडली असेल तर वाढत्या मराठा साम्राज्याला आळा बसला. दक्षिणेला तंजावर पर्यंत मराठा साम्राज्य पसरले होते. 

(दक्षिणेला असताना संभाजी महाराजांना डाळ खायला मिळत नव्हती त्यामुळे दक्षिणेच्या उपलब्ध भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून सांभार चा शोध लावण्यात आला, खास संभाजी महाराजांसाठी म्हणून नाव सांभार आहे. मराठा सम्राज्यामुळे दक्षिणेला सांभार मिळाले )

उत्तरेला मराठा दिल्लीपर्यंत पोहचले होते. तिथं असणारा मुघल सम्राट हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली असायचा. तो जरी मुघल म्हणून उत्तरेत राज्य करत असला तरी त्याला सगळे आदेश मराठा साम्राज्यकडून दिले जायचे. उत्तरेत नाव मुघलांचे असले तरी खर राज्य मराठेच करत होते.

पूर्वेला मराठा साम्राज्य कोलकात्या पर्यंत होते आणि पश्चिम भारतात तर मराठ्यांचेच साम्राज्य होते. 

1761 च पानिपत मध्ये मराठयांचा मोठा पराभव झाला असला तरी पुन्हा मराठा साम्राज्य वाढलं असतं कारण अहमदशाह अब्दाली ला भारतात थांबून राज्य करण्यात रस नव्हता. त्याने मराठ्यांचा पराभव केला, संपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट केली आणि अफगाणिस्तानला परत गेला.

त्यामुळे जर भारतात ब्रिटिश आले नसते तर पानिपत च्या पराभवानंतर देखील भारतात पुन्हा मराठ्यांनीच आपलं साम्राज्य उभा केल असत.

सुरुवातीला सर्व साम्राज्यात मराठा सैन्याच प्राबल्य असतं. त्यानंतर मराठ्यांनी हळूहळू सत्तेचं विकेंद्रीकरण केलं असत. देशाचे 20-25 भाग करून प्रत्येक ठिकाणी आपले पेशवे / सरदार ठेवले असते. ज्यांच्यावर एक कोणीतरी मराठा प्रमुख असता (पंतप्रधान सारखा) आणि त्याच्या सूचनेनुसार सर्व देशाचा कारभार या पेशव्यांच्या मार्फत चालला असता. याकाळात देखील एक प्रतिक म्हणून कोणतातरी मुघल दिल्लीत बसला असता ज्याच्या नावाने कामकाज चाललं गेलं असत पण सर्व सत्ता आणि सैन्य हे मराठ्यांचेच हातात असतं.

सर्व जगभरात ज्याप्रमाणे झालं त्याचप्रमाणे 19 व्या शतकापर्यंत हळूहळू आपल्या देशात सुद्धा लोकशाहीच्या प्रथा यायला सुरुवात झाली असती. तसच सैन्य आणि संपत्ती ने आपला देश प्रबळ राहिला असता. त्यामुळे रेल्वे, उद्योगधंदे आपल्या देशात १९ व्या शतकात आलेच असते. 

सर्वात महत्वाचं म्हणजे भारताची हिंदू मुस्लिम अशी फाळणी झाली नसती कारण सत्तेच्या गादीवर एक मुस्लिम मुघल बसला होता तर हिंदू मराठा खाली त्याच्या नावाने राज्य करत होते. लोकांनी एकत्र काम केलं असत, उद्योग धंदे केले असते. याच उदाहरण देखील आहे, शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगून ठेवलं होतं की युद्धाच्या दरम्यान जर तुम्हाला कधी कुराण सापडलं तर तुम्ही ते आदराने सांभाळा आणि कोणत्यातरी मुस्लिम व्यक्तीकडे द्याल. अशाप्रकारचं वातावरण सगळ्या देशात तयार झालं असतं मराठा साम्राज्या अंतर्गत. आणि हेच वातावरण कायम राहून 20 व्या शतकात संविधानिक लोकशाही आली असती.

खालील व्हिडीओत आपण ५६ मिनिटांपासून पाहू शकता. 

 

हे ही वाच भिडू. 

3 COMMENTS

  1. खरंच असे काही वाचल्यावर अभिमान वाटतो.
    जय शिवराय…

  2. हे सत्य आज अस्तिवात असते तर खरंच आज आपण राम राज्य स्वतः च्या डोळ्यांनी बघितले असते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here