महाराजांना राग आला आणि मुंबईची टॅक्सी कायमची “काळी-पिवळी” झाली.

काळी पिवळी. मग डमडम घ्या, डुक्कर गाडी घ्या, वडाप घ्या एस्टी सोडून सार्वजनिक वापरासाठी जे लागतं ते सगळं घ्या. सगळा गाव बसणार अशा प्रत्येक गाड्या काळ्या-पिवळ्या रंगामध्ये असतात. पण दिल्लीमध्ये काळीपिवळी चालत नाही तिथल्या रिक्षाचा कलर हिरवा. कलकत्त्याला सगळ्या टॅक्सी पिवळ्या रंगाच्या. मग आपल्या या मायभूमीतच “काळा-पिवळा” कुणाला आवडला असावा.

म्हणजे त्या दिशेने आम्ही वैचारिक घोडे दामटले आणि वेगवेगळ्या लिंक, पुस्तक घावले. सगळं सगळं वाचून काढलं. का तर भिडू लोकांना मोजकं मिळालं पाहीजे पण अस्सल मिळालं पाहीजे. 

तर मग वाचा, ह्या टॅक्सी, रिक्षा आणि वडाप काळेपिवळी कसे झाले. 

तर हि गोष्ट भारतात टांगे होते त्यावेळेची. टांग्याची मुंबई नुकतीच गाड्यांमध्ये बदलत होता. रस्त्यांवर राजे महाराजे, ब्रिटीश अधिकारी यांच्या गाड्या हळुहळु धावू लागल्या होत्या. त्यानंतर लोक देखील वाढू लागले होते. ट्राम होती. टाटा यांची पहिली कार मुंबईत धावू लागल्याचे संदर्भ मिळतात. टाटा यांनी १९०१ मध्ये पहिली कार घेतली होती. आत्ता टाटाबद्दल सांगायच झालं तर ते त्यांच्या प्रत्येक गाडीचं रजिस्ट्रेशन १ जानेवारीला करत.

पण ती गोष्ट नंतर आत्ता टॅक्सी काळीपिवळी होण्यामागचा इतिहास समजून सांगतो. 

तर झालं अस की, मुंबईत १९१० नंतरच्या काळात मुंबईमध्ये सार्वजनिक वापरासाठी गाड्यांना परवानगी दिली. अर्थात टॅक्सीस सुरवात झाली. पण सुरवातीच्या काळातल्या टॅक्सी म्हणजे मर्सडिज, फोर्ड किंवा त्या कंपन्याच्या दुय्यम प्रकारच्या गाड्या असत. वरती असणाऱ्या टपाच्या ऐवजी साधे कापड असायचे. पण हळुहळु सार्वजनिक वाहतुकीच्या ताफ्यात चांगल्या दिसणाऱ्या राजेशाही गाड्या देखील येत गेल्या. आजच्या सारखे टॅक्सी म्हणले की फियाट किंवा अॅब्मेसिटर असते तसा प्रकार तेव्हा नव्हता. फायद्याच्या गणितातून चांगल्या दिसणाऱ्या फोर्ड, ब्युक सारख्या कंपन्यांच्या गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीचे काम करायच्या. 

आत्ता मॅटर असा झाला की पुढच्या पाच ते दहा वर्षात मुंबईत गाड्यांच प्रमाण वाढलं. देशविदेशातून राजे महाराजे जिवाची मुंबई करायला मुंबईत येवू लागले. तर तेव्हा असा मॅटर होता की, सगळ्या गाड्यांना एकच कलर द्यायची आणि तो म्हणजे ब्लॅक. 

गाडी राजाची असो नाहीतर सार्वजनिक वाहतुकीची गाड्यांचा कलर फक्त आणि फक्त काळा. त्याचा परिणाम असा झाला लोकांना गाड्यांमधला फरक कळत नव्हता. म्हणजे रस्त्यावरुन टाटांची गाडी चालली काय किंवा एखाद्या राजा महाराजांची माणसाची गाडी चालली काय लोकं सर्रास हात दाखवून गाडी थांबवण्याचं ध्येयधोरण राबवायचे. पण या साध्या गोष्टींचा परिणाम मात्र भयंकर व्हायचा. कारण ब्रिटीश असले तरी राजेशाही गेली नव्हती.

मुंबईत येणारी माणसं मग सर्रास राजांच्या गाडीला हात दाखवू लागली. अशा वेळी राजा लोक गाडी पुढे घेवून जायचं काम करत नव्हती. तर बऱ्याचदा राजाची गाडी थांबायची. मग त्याचे रक्षक टाईप लोक हुज्जत घालायचे. प्रसंगी माणसाला प्रसाद मिळायचा. यातून मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर रोजची भांडण दिसू लागली. 

त्यानंतर निर्णय झाला की गाडीच्या मध्यावर एक पिवळं फडकं बांधायचा. हे फडकं दिसलं की समोरुन येणारी गाडी हि टॅक्सी असल्याची खूण लोकांना कळू लागली. आत्ता हा निर्णय नेमका कोणी घेतला हे सांगण अवघड आहे पण एकएक करत संपुर्ण मुंबईत अशा पिवळं फडक बांधलेल्या टॅक्सी वाढू लागल्या. 

आत्ता मुंबईकरांना नवी ओळख मिळाली पण ती देखील तात्पुरती. त्यानंतर ब्रिटीश शासनाच्या ताब्यात असतानाचा टॅक्सीच्या समोर असणाऱ्या पिवळ्या फडक्याला पिवळा रंग थापण्यात आला. त्यानंतरच्या दिवसांपासून ऑफिशियल टॅक्सी काळी पिवळी झाली. मुंबई आमचीच च्या नाऱ्यात महाराष्ट्रातल्या रिक्षा, वडाप पासून ते डुक्कर गाडीला देखील हाच रंग मिळाला. वरच्या भागात पिवळा. बाकीचा गाडी कंपनीतून यायची तशीच काळी. 

आत्ता हि स्टोरी कितीही थापाडी वाटलं असती तरी खरी हाय. कधी कधी गोष्टी इतक्या रर्साल घडतात की त्यांवर विश्वास ठेवायला जड जात. काळ्या पिवळीची हि गोष्ट देखील अशीच. 

हे ही वाचा.