बीएस्सी बीएड असणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? 

पोरगी दिसली, गालात हसली ओके… सहा महिन्यात गेली सोडून… 

इंदुरीकर महाराजांनी नेमकां भक्तसंप्रदायात कोणता बदल केला अस विचारलं तर उत्तर येईल महाराजांनी भक्त संप्रदाया पुढे नवा फॅन संप्रदाय देखील निर्माण केला. भक्त मिळतील का माहित नाही पण इंदुरीकर महाराजांचे फॅन मात्र गावागावात मिळतील.  

महाराजांबद्दल विचारलं तर काहीजण म्हणतील ते लाखभर रुपये घेतात. काही म्हणतील अध्यात्म सोडून ते गावकीची भाषणं सोडत बसतात. पण एका गोष्टीत सर्वांच एकमत होण्यास हरकत नाही ती म्हणजे, महाराज जब्बर बोलतात.  

महाराजांचे किर्तन तर तोंडपाठ असतील पण तुम्हाला महाराजांच्या बेसिक गोष्टी माहित आहेत का ? या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहीजेत कारण महाराजांनीच सांगितलय बेसिक क्लियर करा.

१) महाराजांना किती टक्के पडलेत. ते आम्हाला माहित नाही पण महाराज बीएस्सी बीएड आहेत. आत्ता महाराजाचं वय बघता आणि तत्कालीन परस्थितीचा अंदाज घेता बीएस्सी बीएड असणं म्हणजे उच्चशिक्षीत असणं हे फिक्स. थोडक्यात महाराज उच्चशिक्षीत आहेत. 

२) महाराजांच पत्नी शालिनीताई देशमुख या स्वत: किर्तनकार आहेत. यु ट्यूबवर महाराजांइतक्या त्या पॉप्युलर नसल्या तरी त्यांचे किर्तन देखील लोक आवडीने ऐकतात. महाराजांच लग्न होवून अंदाजे पंधरा सोळा वर्ष झाल्याचं त्यांच्या जवळची लोकं सांगतात. पत्नीबरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असा चौकोनी संसार महाराजांचा आहे. 

३) महाराजांच मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी. सध्या महाराज संगमनेर तालुक्यातील ओझर गावात स्थायिक झाले आहेत. 

४) २०१९  आणि २०२० दोन्ही वर्षाच्या महाराजांच्या तारखा बुक आहेत. रोजचे तीन व्याख्यानं याप्रमाणे महाराजांच्या तारखा अडव्हान बुक झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराजांना व्याख्यानासाठी आणायचा विचार करत असाल तर २०२१ नंतरचा विचार करा. 

५) महाराज व्याख्यानासाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यन्तची रक्कम घेतात. अनेकजण महाराजांवर इतके पैसे घेतात म्हणून टिका पण करतात. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here