बॅण्डस्टॅण्ड, Z ब्रिज ते रंकाळा हि आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध “प्रेमस्थळे”. 

पावसाळ्यात फिरायला जायची ठिकाणे, महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे, अशा प्रकारच्या गोष्टी शाळेच्या भुगोलाच्या पुस्तकात असतात. पण एक गोष्ट असते ती शाळेच्या पुस्तकात कधीच नव्हती. पण ते म्हणतात ना, जिथ कमी तिथं आम्ही. शाळेच्या पुस्तकात नसणारा पण शाळेपासूनच प्रत्येकाच्या आयुष्यात सुरू होणारा धडा असतो तो प्रेमाचा. आयुष्यात प्रेम नावाच प्रकरण आलं की भल्याभल्यांच्या पायाची चाकं होतात. प्रेमात पाहीजे असतो “स्पेस”. 

आत्ता अशा स्पेसला संस्कृतीरक्षक अश्लिल चाळे करण्याची ठिकाणी देखील म्हणू शकतात. पण प्रत्येकाला अश्लिल चाळे करण्यासाठी जायचं नसतं. नव्यानं उमलत असल्यामुळे एकातांत चार गोष्टी कराव्यात एवढीच इच्छा असतेय. आत्ता या स्पेसच्या नादात शिवरायांचे किल्ले किंवा धार्मीक ठिकाणी जावून अपवित्र करण्याचे उद्योग चालतात. पण तिथे मारहाण करुन उपयोग नाही. भिती दाखवून उपयोग नाही. जोडप्यांना प्रेमाने सांगून नक्कीच फरक पडत असतो. 

असो तर मुळ मुद्यावर येवू आज प्रेमाचा सण अर्थात व्हॅलेंन्टाईन डे आहे. आजच्या या दिवशी कुठं जायचं हा प्रश्न पडला असेल म्हणून बोलभिडू सांगत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेमस्थळे. 

सुरवात करुया मुंबईपासून. मुंबईतला सर्वात हक्काच ठिकाण म्हणजे नरिमन पॉईन्ट, मरिन ड्राईव्ह. मस्तपैकी समुद्राच वार खात इथे पहिल्या भेटीच्या चर्चा करुन शकता. त्यातही नवे नवे मुंबईकर असलात आणि नवंनवं प्रेम असलं की हे सोयीच ठिकाण असतं. हळुहळु प्रेम मुरायला लागलं की, पावलं बॅण्डस्टॅण्डच्या दिशेनी टाकावीत. त्याच्या पुढचा स्पेस इथे मिळतो. फक्त इथ एकच काळजी घ्यायला लागते ती म्हणजे समुद्राच्या पाण्याची. बांद्रा परिसरात असणारा बॅण्डस्टॅण्ड पण तुम्हाला शोधत जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या हक्काचा दगड इथे शोधायला वेळ लागतो. आत्ता तिथूनही पुढे प्रेम सरकू लागलं तर अक्सा बीच आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या दिशेने पावलं टाकली जातात. पण संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये न जाण्याचा सल्ला बोलभिडू देईल. उगीच जंगल में मंगल करण्यात अर्थ नाही कारण मुंबईच असलं तरी इथे बिबळ्या आहे. हे ध्यानात असू द्या. 

पुढचं ठिकाण पुण्यातचं. पुण्यात Z ब्रीज हि सर्वात लोकप्रिय जागा आहे. हा ब्रिज फक्त दुचाकीसाठी आहे. त्यात डेक्कनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे शोधण्यासाठी विषय गरज लागत नाही. झेड आकाराचा आहे म्हणून Z ब्रीज. इथे कोपरा पकडायचा गाडी लावायची. आणि बसायचं. कोणाचच टेन्शन नसतं. फक्त १० वाजून गेले की पोलीस येवू लागतात. ते फक्त उठवून हाकलतात त्यामुळे लोड घेण्यासारखं काही नाही. बाकी सारसबाग हि सर्वात सुंदर जागा. तिथे पाय पसरुन बसायला येते. पुणे विद्यापीठातलं इप्रेस गार्डन हे देखील गरजेच्या वेळी सर्वात सोप्पा मार्ग असल्याच अनेकजण सांगतात. 

पुण्यानंतर लागतं ते सातारा. साताऱ्यातलं जवळच ठिकाण म्हणजे अजिंक्यतारा किल्ला. पण बोलभिडू अशा पवित्र ठिकाणी जायला पाठिंबा देत नाही. दूर पडतं पण साताऱ्यासाठी खास अश कास पठार आहे. सातारकरांनी अशा रंगेबिरंगी गोष्टींचा आनंद घ्यावा. साताऱ्यानंतर नंबर लागतो कराडचा. कराडचं ठिकाण म्हणजे प्रितीसंगम. समाधी परिसराच पावित्र राखत बाजूच्या घाटावर जायला हरकत नसते. आत्ता आपण येवून कोल्हापूरात. 

कोल्हापूरात बॅण्डस्टॅण्ड म्हणजे रंकाळा. इथे उघडउघड बसायला काहीच हरकत नसते. पण पलीकडच्या झाडीत गेलात आणि पेठेतली पोरं आली तर वरात थेट पोलीस स्टेशनपर्यन्त निघू शकते. भेटायचच आहे तर इथे भेटा. राहता राहिलं पन्हाळा. पन्हाळ्यावर गाड्यांची सोय आहे. मुलंमुली पन्हाळ्याला जातात पण लक्षात ठेवा कोल्हापुरकर अस्मिता जपतात. किल्यावर नाही तर किल्याच्या पायथ्याला जो भाग किल्याच्या बाहेर येतो तिथे भेटण्यासाठी पुढाकार घेतला जातो. 

आत्ता सांगली. शहराला नदी असणं हे प्रेमासाठी सर्वात सुखाची गोष्ट असते. सांगलीच घाटावर भेटायचं असतं. बाकी अमराई पण आहेच. सांगली कोल्हापूरच्या अधल्यामधल्या लोकांसाठी आलमप्रभूचा डोंगर आहेच की.  

आत्ता सोलापूर. सोलापूरात भूईकोट किल्ला गाजलेला आहे. शहराच्या एका बाजूला असणारा कंबर तलाव व त्याच्या बाजूला असणारं वनविहार सुप्रसिद्ध आहे. सोलापूर नंतर उस्मानाबाद घेवूया. उस्मानाबादकर सांगतात रामलिंग परिसर आणि आणि हातलादेवी या परिसरात जोडपी जातात. त्यानंतर लातूर नाना नानी पार्क, PVR टॉकिज, पॉलिटेक्निक स्टेडियम, अष्टविनायक गार्डन, वृंदावन पार्क अशी भल्लीमोठ्ठी लिस्ट लातूरकरांनी आम्हाला पाठवली. प्रेमासाठी इतकी ठिकाण असणारं लातूर खरच ग्रेट असावं. नांदेडमध्ये नगिणा घाट, बंदा घाट, नाना-नानी पार्क, विसावा गार्डन, स्टेडियम, वजिराबाद मार्केट, भाग्यनगर पॉईन्ट अशी ठिकाणे आहेत. बीड मध्ये माने कॉम्प्लेक्स, स्टेडियम, कपिलधार, खंडेश्वरी (दिपमाळ) मंदिर, बिंदूसरा धरणं, शिवदरा आणि परभणी मध्ये कृषी विद्यापीठच्या पाठीमागे. 

आत्ता येवूया नगर भागात नगर भागात सिद्धी गार्डन आहे. भूईकोट किल्ला आहे, अंकाई डोंगराच्या परिसरात आणि लोणटेक भागात देखी भेटाभेटी चालते. याचबरोबर भंडारदरा, घाटघर आहेच. औंरगाबादच विचारलं तर म्हैसमाळ सगळ्यात चांगल ठिकाण म्हणे पण विद्यापीठाचा परिसर हा सर्वात सुरक्षित समजला जातो. 

मराठवाडा झाल्यानंतर आपण विदर्भात जावू. सुरवात विदर्भाची राजधारी आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीपासून. नागपुरचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे अंबाझरी तलाव, त्यानंतर लागतो फुटाळा तलाव, अमरावतीत फेमस असणार ठिकाण म्हणजे मालटेकडी, यवतमाळच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात घाटात. मग तो कुठलाही चालतो. तसा पहिला प्रेपरन्स इथले लोकं दारवा रोडच्या घाटाला देतात. चंद्रपूरच्या लोकांसाठी बल्लारसा रोडवर एक बॉटेनिकल गार्डन आहे. त्यानंतर पुढे मुरूड रोड, चिमूर रोडला लागतात की घाटच घाट आणि जंगल. 

आत्ता राहिलं ते म्हणजे नाशिक. फाळके स्मारक, आसाराम बापू पूल, गंमत जमंत उद्यान, गंगापूर डॅमच बॅकवॉटर, कॉलेज रोड, सोमेश्वर अशी काही ठिकाण आहेतच.

आणि शेवटचं कोकण, कोणसाठी म्हणजे सगळीकडेच निसर्ग. त्याबद्दल एक कविता आहे. महेश केळुस्करांची. ती वाचा आणि आनंद घ्या.

आत्ता तुमची खास ठिकाणे, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणी आणि १०० रुपये तासावर चालणारी कॉफी शॉप आहेतच.  

 

हे ही वाचा.