डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं आहे – योगी सरकार

योगी सरकारने काल एक महत्वपुर्ण विधेयक मंजूर केले असून या विधेयकानूसार Dr.Bhimrao Ambedkar  यांच नाव बदलण्यात आलं असून आत्ता Dr. Bhimrao RAMJI Ambedkar अशा नावाचा उल्लेख सर्व सरकारी कार्यालयांनी करावा असे आदेश योगी सरकारने दिली आहेत.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी डिसेंबर २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात यावा याबाबत पाठपुरावा केला होता. महाराष्ट्रात वडिलांचे नाव लावणं महत्वाचं समजलं जातं असा संदर्भ त्यांनी नाव बदलण्यामागे दिला होता. त्याचसोबत आंबेडकर आडनावाचा उल्लेख करत असाताना तो अंबेडकर असा न करता आंबेडकर असा केला जावा असे आदेश देण्यात आले आहेत.  

याबाबत संदर्भ देत असताना खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना सादर करत असताना स्वत:च्या नावाचा उल्लेख डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असा केल्याचा दाखला देण्यात आला आहे. योगी सरकारचे आजपर्यन्तचे निर्णय पाहता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या नावामधून रामजी नावाचा उल्लेख करण्यामागचा नेमका हेतू लपून राहू शकत नाही.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here