ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार – आझाद मैदान

AZAZ MAIDAN
गांधीजींची ऐतिहासिक सभा ते किसान मोर्चा- ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार…

आझाद मैदान’

मुंबईतल्या फोर्ट एरियामधलं ‘आझाद मैदान’. राष्ट्रीय राजकारणात जे स्थान दिल्लीतल्या जंतरमंतरचं, अगदी तितकंच महत्वाचं स्थान राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मुंबईतल्या आझाद मैदानाचं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आझाद मैदान राज्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनांना ठिय्या मांडणाण्यासाठीचं सर्वात महत्वाचं आणि हक्काचं ठिकाण ठरलंय.

अखिल भारतीय किसान मोर्च्याच्या लाल बावट्याखाली राज्यातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात येऊन धडकलाय. त्यामुळे आझाद मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आम्ही सांगत आहोत आझाद मैदानावर घडलेल्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटनांबद्दल …

  • १८ ऑक्टोबर १८५७ रोजी सय्यद हुसेन आणि मंगल गादिया या दोन क्रांतीकारकांना इंग्रजांनी आझाद मैदानावरच सार्वजनिकरीत्या तोफेच्या तोंडी दिलं होतं. १८५७ चा उठाव जरी अयशस्वी ठरला तरी या घटनेने इंग्रजी राजवटीचा भीषण चेहरा समोर आला. प्रामुख्याने उत्तर भारतातून सुरु झालेला हा उठावाचे लोन दक्षिण भारतात पोहचले.
  • १९३० मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात देशात तिरंगा फडकावण्यावर बंदी होती. त्यावेळी मुंबईमध्ये २६ ऑक्टोबर १९३० रोजी अवंतिकाबाई गोखले या महिलांचा मोर्चा घेऊन आझाद मैदानावर गेल्या आणि पोलीस कमिशनरचा आदेश झिडकारून त्यांनी आझाद मैदानात तिरंगा फडकवला. पोलिसांनी या मोर्चावर लाठीचार्ज केला.
  • १९३१ साली महात्मा गांधीजींनी देशभरातील जनतेला इंग्रज सरकारशी असहकार करण्याचं आवाहन केलं. या चळवळी दरम्यानची गांधीजींची ऐतिहासिक सभादेखील आझाद मैदानावरचीच. ही आजपर्यंतच्या इतिहासातील मुंबईतील सर्वात मोठी राजकीय सभा होती. त्याआधी गांधीजींची एकच सभा या मैदानावर झाली होती परंतु या सभेनंतर गांधीजींनी स्वतंत्रसंग्रामादरम्यान अनेक सभा आझाद मैदानावरच घेतल्या.
  • आझाद मैदान किंवा पूर्वीचं ‘बॉम्बे जिमखाना मैदान’ हे सद्यस्थितीतील क्रिकेटचं मैदान. १९८७ च्या हॅरीस शिल्ड ट्रॉफीमधील सचिन तेंडूलकरने आपला जोडीदार विनोद कांबळी सोबत रचलेली ६६४ रन्सची ऐतिहासिक भागीदारी असेल किंवा ज्या खेळीने देशाला पृथ्वी शॉ माहित झाला ती त्याची ५४६ रन्सची इनिंग आझाद मैदानावरचीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here