कालच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये हे ५ नवे विक्रम बनले आहेत.

भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी असते. त्यात वर्ल्ड कप असेल तर बोलायला नको. क्रिकेट जगातली सर्वात मोठी रायव्हलरी म्हणून या मचला बघितलं जात. या मॅच प्रमाणे बॉल आणि बॅटचा सामना कुठेच पाहायला मिळत नाही. काल मात्र पाकिस्तानच्या दुबळ्या टीममुळे विशेष लढाई झालीच नाही. तरी या सामन्याने बरेच विक्रम मोडले. काही नव्याने बनले. चला तर बघू कोणते विक्रम या सामन्याने बनले ते.

रोहित शर्माच्या सलग पाचव्यांदा पन्नास अधिक धावा.

रोहित शर्माचा या वर्ल्ड कपमध्ये फॉर्म स्वप्नवत आहे. त्याने पहिल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक, त्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक आणि कालच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात परत सेंच्युरी असे तीन वेळा ५०हून अधिक धावा बनवल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्याने वर्ल्डकपपूर्वी या वर्षीच्या सुरवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात देखील एकदा ९५ आणि ५६ अशी सलग दोन अर्ध शतके झळकवली होती.

एकूण बघता रोहित शर्माने सलग पाचव्यांदा अर्धशतका पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा एकप्रकारचा रेकॉर्ड आहे. यापूर्वी अशी कामगिरी फक्त सचिन, विराट आणि रहाणे यांनाच जमली आहे.

वर्ल्ड कपची पहिलीच मॅच आणि पहिल्याच बॉलवर विकेट

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची १५ खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पर्यायी खेळाडू म्हणून अंबाती रायडू ऐवजी विजय शंकर याची निवड करण्यात आली. पण पहिल्या तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि पुढच्या काही सामन्यांसाठी तो संघातून बाहेर झाला. तेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या पुढच्या सामन्यात ओपेनिंग कोण करणार हा केएल राहुलमुळे सुटला खरा, पण त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण प्रश्न उभा राहिला.

तेव्हा निवड समितीने विजय शंकर याला संधी द्यायला हवी असे ठरवून त्याची निवड करण्याच्या निर्णय घेतला.

कालच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने टोस हरल्यावर प्रथम फलंदाजी करत ३३६ धावांचा विशाल डोंगर उभारला. त्याच्या उत्तरादाखल पाकिस्तान संघ फलंदाजी करण्यास मैदानावर उतरला. ४ ओवेर्स होऊन भूनेश्वर कुमार ५वी ओवर टाकत असताना अचानक त्याच्या मांडीचा स्न्यायु खेचला गेला. त्यामुळे त्याला धावणे अशक्य झाले आणि तो ड्रेसिंग रूम मध्ये परतला.

आता ओवरचे उरलेले दोन चेंडू टाकून पूर्ण करायची होती. अशात कर्णधार विराट कोहलीने विजय शंकरच्या हाती चेंडू दिला. त्याने विश्वास सार्थ ठरवत इमाम-उल-हक याला पायचीत केले आणि पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन इतिहास रचला. हा कारनामा करणारा तो बर्मुडाचा मालाची जोनास, ऑस्ट्रेलियाचा इआन हार्वी आणि पाकिस्तानच्या मोहम्मद युसुफ नंतर चौथा खेळाडू ठरला.

विराट कोहलीच्या सर्वात जलद ११ हजार धावा

कालच्या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा सर्वात वेगवान ११,००० धावा करण्याचा विक्रम मोडीत काढत तो आपल्या नावे केला. सामना सुरु होण्यापूर्वी हा पल्ला गाठण्यासाठी ५७ धावांची गरज होती, त्याने ६५ चेंडूत ७७ धावांची आक्रमक खेळी करत हा विक्रम केला. ११,००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी सचिन तेंडूलकरला २८४ एकदिवसीय सामने आणि २७६ इंनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या. तेच विराट कोहलीने २३० एकदिवसीय सामने आणि २२२ इंनिंग्स मध्ये करून दाखवले. सचिन तेंडूलकरला यासाठी १२ वर्षे आणि ४१ दिवस लागलेले तर विराट कोहलीने आपल्या ११ वर्षापेक्षा कमीच्या कारकिर्दीत हे साध्य केले.

विराट कोहली हा एकदिवसीय सामन्यात ११,००० धावा करणारा सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, कुमार संघकारा, मेहला जयवर्धने, सनथ जयसूर्या, जॅक कॅलीस, रिकी पोंटिंग आणि इंझमाम-उल-हक यांच्यानंतर ९वा खेळाडू ठरला.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुध्द जिंकण्याच्या भारताचा विक्रम अबाधित

दोन्ही देशाच्या संघात आजपर्यंत खेळवल्या गेलेली प्रत्येक मॅच कुठल्या न कुठल्या किस्स्याने अविस्मरणीय राहिलेली आहे. यात जावेद मियांदादच्या माकड उड्या, खेळाडूंना जाणूनबुजून डिचवणेपासून ते गौतम गंभीरचे आफ्रिदी, कमरान अकमल यांच्यासोबत उडालेल्या खटक्यापर्यंत सगळेच प्रसिद्ध आहे. वर्ल्ड कपच्या बाबतीत म्हणले तर, प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हि सगळ्यात मोठी आणि हायवोल्टेज मॅच असते. कालच्या मॅच आधी १९९२ पासून ते २०१५ पर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान ६ वेळा आमने सामने आलेले. ज्यात सहाच्या सहा मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. तर काल मॅच हि अशी ७वी वेळ होती आणि त्यातही भारताने दणकेबाज विजय मिळवत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवण्याचा विक्रम ७-० ने अबाधित राखला.

हसन अलीने फक्त नऊ ओव्हर मध्ये दिल्या ८४ धावा.

पाकिस्तानचा वेगवान बॉलर हसन अलीची काल कोहली आणि कंपनीने जोरदार धुलाई झाली. त्याने पाकिस्तानकडून एका वर्ल्डकपच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देण्याचा दुर्दैवी विक्रम केला. त्याच्यावर पाकिस्तानी फन्स बरोबर सिनियर खेळाडूनी देखील खूप जोरदार टीका केली आहे. सर्वात विखारी टीका माजी फास्टर शोएब अख्तरने केली आहे.

काही दिवसापूर्वी भारताशेजारच्या वाघा बोर्डरवर त्याने शड्डू ठोकण्याचे चाळे केले होते. शोएब अख्तरनी त्याला सांगितलं देशप्रेम दाखवण्यासाठी असली नौटंकी करण्यापेक्षा मैदानात कामगिरी केली असती तर जास्त बरे झाले असते.

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here